BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उद्या शाळांना सुट्टी



 शिराळा: सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने जिल्हाधिकारी  डॉ. राजा दयानिधी यांनी मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यातील सर्व अंगणवाडी पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा, व महावि‌द्यालये  यांना  उद्या २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. 

अधिक माहीतीसाठी व्हिडीओ पहा  

 

तसे परिपत्र काढेल आहे.त्यात म्हटले आहे, हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार  २५  व २६ जुलै   रोजी सातारा जिल्हयाला अतिवृष्टीचा रेड अॅलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. सांगली जिल्हयातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने व जिल्हयातील कृष्णा नदीवरील आयर्विन पूलाच्या ठिकाणची पाणी पातळी ३८ .०७  फुट झालेने कृष्णानदीचे पाणी इशारा पातळी ओलांडणेची शक्यता नाकारता येत नाही. सांगली जिल्हयात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा, व शिराळा तालुक्यातील शाळांना सुट्टी देणेबाबत कळविले आहे. सांगली जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये . अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्ह्यातील मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यातील सर्व अंगणवाडी पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा, व महावि‌द्यालये (शासकीय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापने वरील शैक्षणिक संस्थेतील सर्व वि‌द्यार्थीना  २७  जुलै २०२४ रोजी  जिल्हाधिकारी   डॉ. राजा दयानिधी यांनी  सुट्टी जाहीर केली आहे. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत / विद्यालयात महावि‌द्यालयात उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपल्ली व्यवस्थापनाचे कामकाज करणेचे असे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments