चांदोली परिसरात चोवीस तासात १६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याने पाचव्या अतिवृष्टी झाली आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ६२१ .७५ मीटर तर पाणीसाठा ८२९ .३४५ द.ल.घ.मी.होता. धरणात २९ .२९ टी.एम.सी.म्हणजे ८५ .१३ टक्के पाणीसाठा झाला होता. धरणात १६९९२ कुसेसने पाण्याची आवक सुरु आहे. विद्युत निर्मितीतून १६५८ तर सांडव्यातून २२०० असा एकूण ३८५८ क्युसेक ने विसर्ग सुरु आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.
0 Comments