शिराळा :वारणा धरण व वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे वारणा व मोरणा नदीला पूर आलेला आहे. नदी काठावरील जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांनी ती सुरक्षित ठिकाणी हलवावीत. नागरिकांनी व युवकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी, ओढा यामध्ये प्रवेश करु नये . पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहन अथवा चालत पुल ओलांडून नये . विद्युत खांबापासून दूर रहावे. जनावरांना नदीपात्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये. नदीपात्रात कोणीही प्रवेश करु नये,लहान मुलांनी पुर पहाण्यासाठी जाऊ नये असे आवाहन तहसिलदार शामल खोत पाटील यांनी केले आहे.
कांदे -मांगले दरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे.चांदोली परिसरात आठ तासात ७५ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. वारणा व मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.खुंदलापूर -मणदूर दरम्यानच्या मुख्य घाट रस्त्यावर जाधववाडी ते मणदूर दरम्यानच्या घाटात पावसाच्या पाण्यामुळे मुख्य रस्त्याचा काही भाग खचला आहे. त्या रस्त्याची पाहणी मंडल अधिकारी विठ्ठल पाटील यांनी केली.यावेळी राजेंद्र साळुंखे,संभाजी पाटील उपस्थित होते. रस्त्याचा भाग खचू लागल्याने या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
0 Comments