शिराळा,ता.२९:येथील श्री.दत्त मंदिरामध्ये कमल बाळासाहेब पाटील ( वय ७२,रा. बेलदारवाडी ) या वृद्ध महिलेच्या अंगावरील दीड तोळ्याचे दागिने गुंगीचे औषध देऊन एका महिलेने चोरून नेले. हि घटना आज सोमवार (ता.२९) रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी ,कमल पाटील ह्या शिराळा येथे आठवडा बाजारासाठी आल्या होत्या. त्या दत्त मंदिर जवळ आल्या असता. एक महिला त्यांचे जवळ आली. या महिलेने तुमच्याकडे काम आहे जरा मंदिरात जाऊ असे सांगितले.त्या दोघी मंदिरात गेल्या व त्यावेळी संशयित महिलेने कमल यांच्या हातात एका रुमालात बांधलेली वस्तू दिली.यानंतर कमल पाटील यांना काहीच समजले नाही. ज्यावेळी कमल पाटील या शुद्धीवर आल्यावर त्यांच्या गळ्यातील दोन पदरी मोहन माळ,कर्णफुले,बुगडी असा अंदाजे दीड तोळ्यांचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. यानंतर संशयित महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती सापडली नाही.हा प्रसंग येथील प्रमुख मार्गावर असणाऱ्या सी.सी.टी,व्ही मध्ये कैद झाला आहे.याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
0 Comments