BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अपघातात शिक्षक ठार Teacher killed in an accident

 


शिराळा.ता,२९:येथील बाह्य वळण रस्त्यावरील हनुमान  मंदिर नजीक अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या  धडकेत  शिक्षक दिलीप शंकर खोत (वय ५०.रा.देववाडी ) हे जागीच ठार झाले. हि घटना  आज  सोमवार (ता. २९) रोजी दुपारी अडीच वाजण्यापूर्वी  घडली. अपघातानंतर अज्ञात वाहन निघून गेले असून त्याचा शिराळा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत राहुल रायसिंग गायकवाड रा. चिखली यांनी वर्दी दिली आहे.

    याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की , दिलीप खोत हे वाकुर्डे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.ते वाकुर्डे बुद्रुक येथून देववाडीला मोटारसायकल वरून निघाले होते. ते शिराळा  येथील बाह्य वळण रस्त्यावर हनुमान  मंदिर नजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकला जोराची धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात  रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम,सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे ,हवलदार  नितीन यादव , सुभाष पाटील यांनी धाव घेतली. दिलीप खोत हे  सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , एक मुलगी , भाऊ असा परिवार आहे.

   मयत दिलीप खोत यांचे उपजिल्हा रुग्णालयात डॉ. जे के मोमीन यांनी शवविच्छेदन केले.रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही बातमी समजताच देववाडी येथील  नागरिक  व  शिराळा तालुक्यातील  शिक्षक सहकाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. पुढील तपास हवालदार संदीप पाटील  हे करत आहेत.


Post a Comment

0 Comments