BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या शेतकऱ्यांच्या जमीन कब्जे हक्काने वारसांच्या नावावर करा- उपमुख्यमंत्री अजितदादा पवारLand possession of those farmers should be done in the name of the rightful heirs - Deputy Chief Minister Ajitdada Pawar

   


शिराळा,ता.२५:मणदूर धनगरवाडा व विनोबाग्राम (ता.शिराळा) येथील शेतकऱ्यांच्या ५७ वर्षापासून असलेल्या मागणीला अखरे न्याय मिळवून दिला आहे. येथील दोनशे एकर जमीन कब्जे हक्काने सोसायटी सदस्यांच्या वारसांच्या नावावर तातडीने (दहा दिवसात) करावी, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.या बैठकीस यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, फत्तेसिंगराव नाईक दुध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक व युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक उपस्थित होते.


पत्रकार परिषद 

 

यावेळी नाईक म्हणाले,धनगरवाडा,विनोबाग्राम येथील गट नं.२२१व व २२२ मधील२०० एकर जमिन आहे.ही जमिन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २५ नोव्हेंबर १९६६ रोजी निर्वनीकरण करून विनोबाग्राम सहकारी सोसायटीच्या नावे कसण्यासाठी दिली होती.१९७५ साली सदर सोसायटी अवसायनात निघाली.त्यावेळी सदरची जमीन शासनाकडे जमा करण्यात आली.मध्यंतरी या जमिनीवर वनविभागाचे नाव लागले होते.ही जमिन सोसायटी सदस्यांच्या वारसांच्या वहिवाटीत होती. धनगरवाडा येथे ६९ कुटुंबे तर ३१५ लोकसंख्या तर, विनोबाग्राम येथे १५ कुटुंबात ५५ लोकसंख्या आहे. 

येथील लोकांना अन्य कोठेही जमीन नसून दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्याने १९९५ पासून माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी या लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील केले होते.जमीन वन विभागाच्या नावावर असल्याने येथील लोकांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी व वाळवा उपविभागाचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या सहकार्याने जमिनीवर लागलेले वन विभागाचे नाव काढण्यात यश आले आहे. याबाबत मी उपमुख्यंत्री अजितदादा पवार व महसूल मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावरून काल उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक होती. त्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सहकार मंत्री वळसे-पाटील, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेनुगोपाळ, उपविभागीय अधिकारी वाळवा श्रीनिवास अर्जुन, शिराळ्याच्या तहसीलदार शामला खोत-पाटील, धनगरवाडा येथील ग्रामस्थांचे प्रतिनिधी बाबूराव डोईफोडे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी,विभागीय वन अधिकारी स्नेहलता पाटील हे व्हीडीओ कॉन्फरन्सने जोडले होते. सर्व वस्तूस्थिती, शेतकरी, ग्रामस्थांची मागणीबाबत माहिती समजून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित मंत्री महोदय व अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोसायटी सदस्यांच्या वारसांना कब्जे हक्काने सदर जमिन त्यांच्या नावावर करावी. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दहा दिवसात करावी,असे आदेश दिले.

सिमेंट काँक्रीटची स्मशानभूमी होणार 

 मणदूर-धनगरवाडा येथील नागरिकांना अद्याप स्मशानभूमी नाही. जमिनीबाबत असलेल्या अडचणीमुळे कोणत्याही शासकीय योजनांचा लाभा देता आला नाही.याकडे आमदार नाईक यांनी लक्ष वेधले असता अजितदादा यांनी येथील सिमेंट काँक्रीट मधील स्मशानभूमीसाठी स्थानिक आमदार विकास निधीतून १० लाख व उर्वरीत रक्कम जनसुविधा योजनेतून द्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

Post a Comment

0 Comments