BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ Increase in water level of Warna river



शिराळा: चांदोली परिसरात   चोवीस तासात १६८  मिलीमीटर पावसाची नोंद  झाली असल्याने सलग सातव्या   अतिवृष्टी झाली आहे. आरळा येथील बस्थानका जवळ असणाऱ्या गाळ्यात पाणी शिरले असून सागाव येथील भीमराव तिके यांच्या घरा जवळ पाणी आले असल्याने तिके कुटुंब स्थलांतरीत झाले आहे. मोरणा गल्ली मांगले येथे पाणी आले आहे.कांदे -सागाव रस्ता बंद आहे.

सकाळी सात वाजता  धरणाच्या पाण्याची पातळी ६२३.३० मीटर तर पाणीसाठा ८६४.३९५  द.ल.घ.मी.आहे . धरणात ३०.५३  टी.एम.सी.म्हणजे ८८ .७३  टक्के पाणीसाठा झाला आहे .  धरणात १६६२४  कुसेसने पाण्याची आवक सुरु आहे.  विद्युत निर्मितीतून १३०५    तर सांडव्यातून ८८१२  असा एकूण १०११७   क्युसेक ने विसर्ग सुरु आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.शित्तूर -आरळा ,चरण -सोंडोली, बिळाशी -भेडसगाव ,सह सागाव -सरूड दरम्यानचा छोटा पूल ,मांगले-कांदे,मांगले-शिंगटेवाडी पूल पाण्याखाली आहेत. आहे.



सतर्कतेचा इशारा

वारणा धरण

वारणा धरण पाणलोट  क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने आज दि. २६/७/२०२४, सकाळी १०.३० वा वारणा धरणातून सद्यस्थीत सूरु असलेल्या   १०११७ क्यूसेक विसर्गात वाढ करुन वक्र द्वार द्वारे १४४८०  क्युसेक व विद्युत जनित्र मधून १३०५ क्यूसेक असे एकुण १५७८५ विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.तरी नदीकाठ च्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

                - वारणा धरण व्यवस्थापन

Post a Comment

0 Comments