शिराळा :आरळा-बेरडेवाडी (ता.शिराळा) येथील घाटात अंदाजे दोनशे फुट दरीत स्कार्पीओ गाडी दरीत कोसळून मणदूर धनगरवाडा येथील संजय रामचंद्र शेळके (वय २७),अर्चना संजय शेळके (वय २३), रुद्र संजय शेळके (वय १ ),रमेश तुकाराम शेळके (वय १३ ) भारती भागोजी डोईफोडे (वय १५) हे पाच जण जखमी झाले आहेत. हि घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
चांदोली धरणातून पाणी सोडले.व्हिडीओ पहा
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी की,मणदुर-धनगरवाडा येथील शेळके कुटुंब स्कार्पीओ गाडी मधुन शिराळयाहुन आरळा बेरडेवाडी मार्गे मणदुर धनगरवाडयाकडे गावी निघाले होते.मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आरळा-बेरडेवाडी जाणाऱ्या घाट मार्गावर मुसळधार पावसामुळे गाडी दहा ते बारा पलटया घेत अंदाजे दोनशे फुट खाली दरीत पलटी होऊन अपघात झाला.यातील पाच जखमींना सोनवडे येथील बाळासाहेब बागडे,नथुराम पवार, प्रताप नाईक, सचिन नाईक,अक्षय पाटील,तुकाराम पाटील,विशाल नाईक,प्रताप जाधव,सुरेश बाबर, गुढे चे श्रीपती सुतार,आरळा येथील पोलीस पाटील नीलम सूर्यवंशी व इतर ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. १०८ रुग्नवाहीकेतुन पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेची रात्री उशिरा पर्यंत कोकरूड पोलिसात नोंद झाली नव्हती.
नशीब बलवत्तर
प्रत्यक्षदर्शनी दरीत गोलटत गेलेली गाडी पाहता हा मोठा अपघात दिसत होता.मात्र दुदैवाने त्यांचे नशीब बलवत्तर होते म्हुणुन कोणतीही जीवितहानी झाली नाही.
0 Comments