चांदोली परिसरात शिराळा चोवीस तासात १७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याने सलग सहाव्या अतिवृष्टी झाली आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ६२२.६० मीटर तर पाणीसाठा ८४८ .४७६ द.ल.घ.मी.होता. धरणात २९.९७ टी.एम.सी.म्हणजे ८७ .१० टक्के पाणीसाठा झाला होता. धरणात १६७०६ कुसेसने पाण्याची आवक सुरु आहे. विद्युत निर्मितीतून १६७० तर सांडव्यातून ७२१६ असा एकूण ८८८६ क्युसेक ने विसर्ग सुरु आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.
वारणा धरणाचे चारी दरवाजे एक मीटर ने उचलून सांडव्यातुन वारणा नदी पात्रात सोडण्यात आल्याने आरळा - शित्तुर व चरण - सोंडोली पुल पाण्याखाली गेला आहे. मांगले-कांदे पूल पाण्याखाली आहे.मांगले-शिंगटेवाडी पुलावर पाणी आले आहे. सागाव -सरूड पुलाला पाणी घासून चालले आहे.त्यामुळे शाहुवाडी व शिराळा तालुक्यातील गावांचा जवळचा संपर्क तुटला आहे.तसेच सोनवडे,चरण,सागाव,मोहरे येथील स्मशानभुमी पाण्यात आहे. मणदूर, सोनवडे,आरळा, मराठवाडी,काळुंद्रे उबाळेवस्ती ,चरण - सोंडोली, मोहरे,शेडगेवाडी, खुजगांव, कोकरुडसह मांगले पर्यंत अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत.
0 Comments