शिराळा,ता.२८ : शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कमी जास्त होत आहे. मात्र वारणा धरणातील पाणी पातळी स्थिर आहे. वारणा नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होऊ लागली आहे. गेले तीन दिवसापासून शिराळा तालुक्यातील वारणा काठच्या ५२ कुटुंबातील २४४ लोकांना व १८८५ जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहेत. ७१ घरांची अंशत: पडझड झाली आहे. २० गावतील १६ रस्ते , १२ पूल अद्याप ही पाण्याखाली आहेत. त्यामुळे शिराळा तालुक्यातील वारणा काठच्या लोकांचे अजून हि जनजीवन विस्कळीत झाले आहे
बिळाशी -भेडसगाव रस्ता व पूल पाण्याखाली. कुटुंब ३ व १०९ जनावरे स्थलांतरीत असून ४ घरांची पडझड आहे.पुनवत येथील स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता पाण्याखाली.कुटुंब ३ व ४८ जनावरे स्थलांतरीत असून १ घराची पडझड आहे. कोकरूड येथील कोकरूड -रेठरे रस्ता व बंधारा पाण्याखाली आहे. ५०० जनावरे स्थलांतरीत असून १ घराची पडझड आहे. चिंचोली येथील ४ कुटुंब व ७ जनावरे स्थलांतरीत असून ३ घरे व १ शौचालयाची पडझड आहे.काळुंद्रे येथे ८ कुटुंब व १६ जनावरे स्थलांतरीत. ५ घराची पडझड आहे. आरळा येथील आरळा-शित्तूर मुख्य रस्ता व पूल पाण्याखाली आहे. आरळा -इनामवाडी हा रस्ता पाण्याखाली आहे. ४ घरांची पडझड झाली .शिराळे खुर्द येथील ४ घरांची पडझड आहे.मांगले येथील मांगले -सावर्डे रस्ता व बंधारा , मांगले- कांदे, मांगले -शिंगटेवाडी,मांगले -काखे रस्ता व पूल पाण्याखाली आहे. १७ कुटुंब व १४५ जनावरांचे स्थलांतर असून ९ घरांची पडझड आहे. चरण येथे चरण- सोंडोली रस्ता व पूल पाण्याखाली गेला आहे. १ कुटुंब व ७ जनावरांचे स्थलांतरीत असून ३ घरांची पडझड आहे.सोनवडे येथे ३ कुटुंब व १२ जनावरे स्थलांतरीत असून ४ घरांची पडझड आहे. कांदे त कांदे -मांगले , कांदे -सावर्डे कांदे -सागाव रस्ता व पूल पाण्याखाली आहे. १९५ जनावरे स्थलांतरीत असून ४ घरांची पडझड आहे.नाठवडेत १ घर व १ शौचालय पडझड आहे. मणदूर येथे मणदूर - सम्राट अशोकनगर रस्ता व ओढ्यावरील पूल पाण्याखाली आहे .८ घरांची पडझड आहे. पणुंब्रे तर्फ वारूण येथे ७ घरांची पडझड आहे. कणदूर येथे ४७ जनावरे स्थलांतरीत असून २ घराची पडझड आहे.सागाव येथे सागाव -सरूड रस्ता व तराळकी ओढ्यावरील पूल पाण्याखाली आहे. ३ कुटुंब व ३७२ जनावरे स्थलांतरीत असून ३ घराची पडझड आहे. देववाडी येथे देववाडी -ठाणापुडे रस्ता ,देववाडी -काखे रस्ता पाण्याखाली असून ८ कुटुंब व ३८९ जनावरे स्थलांतरीत असून २ घरांची पडझड आहे. खुजगाव येथे १ कुटुंब व १६ जनावरे स्थलांतरीतअसून १ घरांची पडझड आहे. चिखली येथे चिखली कांदे रस्ता पाण्याखाली गेला आहे .१ कुटुंब व ५ जनावरे स्थलांतरीत आहेत . मोहरे येथे १७ जनावरे स्थलांतरीत असून ३ घरांची पडझड झाली आहे.
या गावाला टँकर व वॉटर ए.टी.एमचा आधार
पुराच्या पाण्यात विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्याने गावचा नळपाणी पुरवठा बंद असल्याने मांगले, सागाव, मोहरे ,प.त.वारुण ,खुजगाव ,चरण या सहा गावात टँकर ने तर कणदूर येथे वॉटर ए.टी.एम.द्वारे पाणी पुरवठा होत आहे.
0 Comments