शिराळा :गुन्हयामध्ये मानवी हाडांचा सांगाडा मिळुन आल्याने पोलिसांना मयताची ओळख पटवणे खुपच अवघड होते. सदर मृतदेहाची आणि त्याचे नातेवाईक यांची ओळख पटवण्यासाठी व अज्ञात आरोपीच्या शोधासाठी पाच तपास पथके तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली. खुनात वापरलेली गुड लक बॅग ही पोलिस यंत्रणेला तपासात गुड लक अन मारेकऱ्यासाठी बॅड लक ठरली. ९० दिवसा पूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा १०० व्या दिवशी झाला. त्या नंतर अवघ्या १२ व्या दिवशी गुडलक बॅगेचे गुढ पोलिसांनी गूढ उलगडले. ह्या तपासामागे अनेक पोलीस यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले. त्यामुचे हे शक्य झाले.
खून झालेला राजेश जाधव हा मुळचा कुंडलचा असला तरी त्याचे वास्तव्य पलूसला होते. तो व्यसनाच्या आहारी गेला. सुशिक्षित कुटुंब असल्याने त्याचे नशेत घरी येणे ,भांडण काढून पत्नीवर संशय घेवून तिला त्रास देणे हे दिवसेंदिवस वाढू लागले. त्याच्या रोजच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी त्याचा भाचा देवराज ,पत्नी शोभा आणि मुलगी साक्षी यांनी २१ फेब्रुवारी ला खून केला. तो सतरंजीत गुंडाळून बॅगेत भरला. देवराज ने मोटरसायकलवर वरून आणून शिराळा बाह्यवळण रस्त्याने जात आताना कापरी फाटा ते सुरलेवस्ती दरम्यान असणाऱ्या पुला जवळ कोणी नसल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने छोट्या पुलावरून बॅग टाकून पलायन केले. बॅग नवीन असल्याने व मृतदेह सतरंजीत गुंडाळला असल्याने तीन महिने बाहेर दुर्गंधी पसरली नाही. २० मे रोजी शिराळा येथे एका प्रवाशी बॅग मध्ये सतरंजी मध्ये गुंडालेलाला नायलॉन दोरीने गळा व शरीरास बांधून घातलेला सडलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आला.घटनास्थळी आलेल्या श्वान पथक,ठसे तज्ज्ञ ,फॉरेनसिक व्हॅन यांच्या हाती ठोस पुरावा लागला नाही. तपासात बॅग एका बाजूने व्यवस्थित कट केलेली दिसली.ती कट केल्यानेच दुर्गंधी पसरली. पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकुण पाच तपास पथके तयार करुन त्यांच्यात कामाचे वाटप करुन सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या व मार्गदर्शन केले. घटनास्थळी मिळुन आले प्रवासी बॅग व मयताचे अंगावरील कपडे तसेच जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील बेपत्ता व्यक्ती या आधारे तपास चालु केला होता. हा तपास अतिशय क्लीष्ट व गुंतागुंतीचा होता. तरी ही जिद्द न सोडता अथक परीश्रम घेवुन मुंबई, पुणे, कोल्हापुर, सातारा इत्यादी ठिकाणी प्रवासी बॅगा बनवणाऱ्या कंपनीमध्ये माहीती घेतली. त्यावेळी एका ठिकाणी एक बॅग पलुस येथे विक्री केल्याची माहीती मिळाली. त्याच दरम्यान पलूस येथील बेपत्ता असलेल्या राजेशच्या नातेवाईक यांच्याकडे संशयाची सुई फिरली. त्या नुसार राजेशचा भाचा देवराज,मुलगी साक्षी ,पत्नी शोभा यांच्याकडील चौकशीत विसंगती आढळुन आली. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केलेची कबुली दिल्याने खुनाचा उलगडा झाला. त्यामुळे खुनात वापरलेली गुड लक बॅग ही पोलिस यंत्रणेला तपासात गुड लक अन मारेकऱ्यासाठी बॅड लक ठरली.
पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांचे नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, सतिश शिंदे ,हरिषचंद्र गावडे, प्रविण साळुंखे, युवराज सरनोबत,अनिता मेनकर ,सिकंदर श्रीवर्धन, जयनाथ चव्हाण, गणेश खराडे,कुमार पाटील ,महेश गायकवाड,, कालीदास गावडे, नितीन यादव,संदिप पाटील, शरद जाधव,शरद बावडेकर,प्रशांत देसाई, अमर जाधव, शशिकांत शिंदे, शरद पाटील, राहुल पाटील,सुनिल पाटील, नागराज मांगले यांनी गुन्हा उघडकीस आणणेस परीश्रम घेतले आहेत. पोलीस अधिक्षक यांनी तपास पथकास उत्कृष्ट तपास केलेबाबत बक्षीस जाहीर केले आहे.चौकशीसाठी पाच पथकांच्या माध्यमातून रात्रंदिवस तपास यंत्रणा राबविण्यात आली होती. यासाठी २२ पोलीस कर्मचारी अहोरात्र झटत होते.
0 Comments