BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

लोक चळवळीतून शाळेचा झाला कायापालट The school was transformed through the people's movement



शिराळा:एखाद चांगल काम करताना प्रामणिकपणा मानत ठेवून झोकून देवून काम केल तर त्या कामाचे मूल्यमापन लोकांच्या कडून होत असत.त्यास लोकांचे पाठबळ मिळते. हे कृतीतून मुख्याध्यापक  प्रशांत कदम व अंत्री बुद्रुक च्या ग्रामस्थांनी सिद्ध करून दाखवले आहे. प्रशांत कदम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या  लोक चळवळीतून अंत्री बुद्र्कूच्या महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा कायापालट झाला आहे.

शिराळा उत्तर भाग हा पाण्यापासून वंचित असणारा भाग म्हणून ओळखला जातो. मात्र या भागात महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूरच्या महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या  माध्यमातून शिक्षणाची गंगोत्री वाहू लागली. ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक सुविधा अपुऱ्या पडत आल्याने त्यांना चांगल्या दर्ज्याच्या सुविधा प्राप्त होणे गरजेचे होते. त्यासाठी  संस्थेच्या  जनरल सेक्रेटरी, सरोज पाटील,संस्थेचे अध्यक्ष ॲड.एन .आर. पाटील,उपाध्यक्ष सुनील पाटील, संस्था सदस्य व माजी बांधकाम समिती अध्यक्ष बी .ए .पाटील सर्व संस्था पदाधिकारी यांच्या  मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक प्रशांत कदम  यांच्या संकल्पनेतून दोन वर्षात विद्यालयात सुसज्य असणाऱ्या   मैदान मुरमीकरण,सपाटीकरण, वृक्ष लागवड,संरक्षण भिंत  बांधकाम,सीसीटीव्ही कॅमेरे, आयसीटी लॅब,प्रयोगशाळा नूतनीकरण,खेळ साहित्य, उन्हाळी क्रीडा शिबिराचे आयोजन,विद्यालय सुशोभीकरण अशा विविध भौतिक सुविधांबरोबरच शालेय गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने विशेष प्रयत्न केले आहेत.अंत्री बुद्रुकचे सुपुत्र रोहित रवींद्र आढाव यांचे विशेष प्रयत्नातून बर्नस मॅकडोनेल कंपनी मुंबई मार्फत विद्यालयात तीन लाख रुपये किमतीच्या  शुद्ध पाण्याचा प्रकल्प सुरु केला आहे. १९९८ च्या  दहावीच्या  माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने  माजी उपसरपंच सुनील पाटील,सतीश पाटील व सहकार्यांनी डिजिटल क्लासरूमच्या उद्देशाने विद्यालयास एल.ई.डी  भेट दिला आहे. शाळेचा कायापालट करण्यासाठी  माजी मुख्याध्यापक सुभाष कुशिरे, राजकुमार थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. सरपंच सौ.सुजाता पाटील,उपसरपंच राजेश चव्हाण,सर्व ग्रामपंचायत सदस्य  व व्ही.बी चौगले,जी.एस कांबळे, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य,ग्रामस्थ,माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले

 १० वी,१२ वी उत्कृष्ट निकाल,५ वी,८ वी स्कॉलरशिप परीक्षा,नवोदय,एन. एम. एम. एस. परीक्षा, चित्रकला ग्रेड परीक्षा,जिल्हा,राज्य स्तरावरील विविध खेळांच्या स्पर्धा,वैष्णवी  म्होपरेकर हिने डॉ. होमी भाभा  बाल वैज्ञानिक परीक्षेत मिळवलेले यश आणि एन एम एम एस,सारथी शिष्यवृत्ती परीक्षांमधील यशासाठी पी. पी. वंजारी यांनी घेतलेली विशेष मेहनत  यामुळे शाळा, संस्था व गावाचा नाव लौकिक वाढला आहे.

 इमारत अंतर-बाह्य आकर्षक करण्याच्या उद्देशाने रंग कामासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन  केले असता  दोन महिन्यात विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ,पदाधिकारी, माजी विद्यार्थी यांनी दोन लाख ७५ हजाराची मदत केल्याने   शाळेचा चेहरा-मोहरा बदलला आहे.

 

आता आधुनिक काळातील बदलत्या आव्हानांचा  सामना करण्यासाठी व विद्यार्थ्यांचा बौद्धिक,शारीरिक,मानसिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून विविध आधुनिक उपक्रमांबरोबरच डिजिटल क्लासरूम,संगीत व कला कक्ष,परसबाग, संरक्षक भिंतीवर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणाऱ्या खगोलशास्त्रीय आकृत्या, नकाशे,प्रबोधन पर डिजिटल चित्रे काढून संपूर्ण शाळा बोलकी करण्याचा मानस आहे.

प्रशांत कदम मुख्याध्यापक 

Post a Comment

0 Comments