शिराळा :माळेवाडी ता.शिराळा येथील निराधार बनलेल्या सुर्वणा दिंडे, विद्या दिंडे, प्रसाद दिंडे ,अर्थव दिंडे या चार बालकांना संजय गांधी निराधार योजनेतुन अनाथ बालक अंतर्गत पेन्शन मंजुर झाली आहे.त्या मंजुरीचे पत्र शिराळ्याच्या तहसिलदार शामल खोत पाटील व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलवडे यांच्या हस्ते देण्यात आले.
संजय गांधी निराधार योजनेतील अनाथ बालक योजनेमधुन चारही बालकांना पेन्शन मंजूर करण्यात आली आहे. त्यांना प्रति महिना १५०० रुपये चारही बालकांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणार आहेत. तहसिलदार शामल खोत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केदार नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेचे काम आदर्शवत सुरू आहे.एका सामाजिक बांधिलकी म्हणून या बालकांना मिळालेली तत्काळ मदत यामुळे लोकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य विजय गराडे पाटील , सागर चाळके, सौरभ नलवडे,मंडल अधिकारी सुरेश शेळके ,तलाठी उमेश सावंत ,ग्रामसेवक हिंदुराव पाटील ,अक्षय दिंडे ,विष्णु दिंडे ,गणेश दिंडे ,तानाजी जाधव , पोपट दिंडे ,गुंगा जाधव ,गजानन देसख उपस्थित होते.
0 Comments