BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खून नगर मध्ये अन मृतदेह वारणा नदीत

 

कणेगाव (ता. वाळवा) येथे वारणा नदीच्या पात्रात सडलेल्या अवस्थेतील युवकाचा मृतदेह सापडला. डोक्यात गोळ्या झाडून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.याची कुरळप पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कणेगाव येथे वारणा नदीत मृतदेह आढळला. कुरळप पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता.मृतदेहाच्या डोक्यात गोळी मारून खून केल्याचे तपासांती लक्षात आले आहे. मृतदेहाच्या टी-शर्टवर मोरया चिंचोरे उल्लेख सापडला. त्यावरून सांगली पोलिसांनी नगर पोलिसांशी संपर्क केला. नगर पोलिस मुख्यालयामध्ये मोरयाचिंचोरे येथील भाऊसाहेब पवार हा बेपत्ता असल्याचे फिर्याद दाखल होती. यावरून वारणा नदी येथे सापडलेला मृतदेहाची ओळख पटली. आत्ता या खुनाच्या घटनेचा पुढील तपास सांगली पोलिस मुख्यालयाकडून नगर पोलिस मुख्यालयाकडे वर्ग केला.

अधिक माहितीसाठी व्हिडीओ पहा  

 

शिराळा : नगर जिल्ह्यातील सोनई जवळील आदर्शगाव मोरया चिंचोरे येथून शनिवारी (ता.८ ) रोजी हॉटेलचे साहित्य आणण्यासाठी एकाच वाहनातून अहमदनगरला गेलेल्या तीन जणांपैकी भाऊसाहेब रामदास पवार (वय ३२) रा.मोरया चिंचोरे ता.नेवासा  यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्याद दाखल झाल्यानंतर बरोबर असलेल्या इतर दोन जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात सकाळी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शेंडी बायपास रस्त्याच्या बाजूला खून करून मृतदेह सांगली जिल्ह्यातील कुरळप पोलिस ठाण्याच्या हद्दीत कणेगाव येथील वारणा नदीत टाकण्यात आला होता.

याबाबत अधिक माहिती अशी, मोरया चिंचोरे येथील तीन युवक आठ दिवसांपूर्वी एम.एच.-४८, ए.डब्ल्यू. ३८१५ या वाहनातून मयत भाऊसाहेब पवार, गोरख अशोक माळी व रवींद्र किसन माळी हॉटेलचे साहित्य आणण्यासाठी अहमदनगरला गेले होते. दोन दिवस उलटूनही तिघे घरी आले नाहीत.  सर्वांचे मोबाईल बंद लागत असल्याने नातेवाईकांनी सोनई पोलिस ठाण्यात हरवल्याची खबर दिली होती. शोधमोहीम सुरू असताना पवार यांचा मृतदेह सांगली जिल्ह्यात सापडला.गावातून गायब झालेल्या तिघांपैकी गोरख माळी याने गावठी पिस्तुलातून गोळी झाडून खून केल्याची माहिती हजर झालेल्या रवींद्र माळी याने दिली आहे. अण्णा वसंत पवार यांनी फिर्याद दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी व अमोल भारती यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फौजदार मनोज मोंढे अधिक तपास करीत आहेत.मुख्य आरोपी गोरख माळी यास अटक करण्यासाठी विशेष पथक कार्यरत केल्याचे चौधरी यांनी सांगितले.

टी शर्टामुळे पटली ओळख

सांगली जिल्ह्यातील कुरळप पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारणा नदीत  सापडलेल्या मृतदेहाच्या अंगात असलेल्या टी शर्टवर बजरंगनगर मित्रमंडळ, मोरया चिंचोरे असे नाव होते. पोलिसांनी गावाचा शोध घेऊन सोनई पोलिस ठाण्यात संपर्क केला व छायाचित्र पाहून नातेवाईकांना ओळख पटली गेली.


 


Post a Comment

0 Comments