BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खुनाच्या घटनास्थळाचा केला पंचनामा Panchnama of the place of murder


खालील फोटोवर क्लिक करून मतदान पहा 
खालील नावावर क्लिक करून माहिती मिळावा
लोकसभा मतदार संघ
सांगलीहातकणंगले
संजयकाका पाटीलराजू शेट्टी
विशाल पाटीलधैर्यशील माने
चंद्रहार पाटीलसत्यजित पाटील
उमेदवार एकूण मतेडी.सी.पाटील
तालुका निहाय मतेतालुका निहाय मते

 शिराळा ,ता.३ :राजेश वसंतराव जाधव खून प्रकरणी  उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी पलूस येथील घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे. खून करून  प्रवाशी बॅगेतून  मृदेदेह ज्या मोटारसायकल वरून  शिराळा येथे नेण्यात आला ती मोटारसायकल लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी दिली.

राजेशच्या खून  प्रकरणी भाचा  देवराज ऊर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे,मुलगी  साक्षी, पत्नी  शोभा  या तीन  संशयितांना शिराळा  पोलिसांनी अटक करून शिराळा न्यायालयात हजर केले असता त्यांना दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. आज पलूस येथे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण,पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.मृतदेह शिराळा येथे आणण्यासाठी वापर केलेल्या मोटारसायकलचा शोध सुरु असून ती लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे.

सोमवारी २० मे  रोजी सकाळी साडे नऊ च्या दरम्यान येथील बाह्य वळण रस्त्यावरील कापरी फाटा ते सुरले वस्ती दरम्यान असणाऱ्या पुला जवळ प्रवाशी  बॅग मध्ये  सतरंजी मध्ये गुंडालेलाला नायलॉन दोरीने गळा व शरीरास बांधून घातलेला सडलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आला होता..आरोपीच्या  शोधाकरीता वेगवेगळी पाच तपास पथके तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. मुंबई, पुणे, कोल्हापुर, सातारा इत्यादी ठिकाणी प्रवासी बॅगा बनवणाऱ्या कंपनीमध्ये माहीती घेत असताना  एक बॅग पलुस येथे विक्री केल्याची  माहीती मिळाली. त्यामुळे बॅग आणि बेपता असणाऱ्या  राजेशचा भाचा  देवराज,मुलगी  साक्षी ,पत्नी  शोभा यांच्याकडे केलेल्या चौकशीत विसंगती आढळुन आली. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता  राजेश हा दारुचा व्यसनी होता. पत्नी शोभावर चारित्र्याचा  संशय घेत मारहाण करुन त्रास देता होता .याच कारणातून  फेब्रुवारी महीन्यात राजेशचा खून करुन त्याचे प्रेत शिराळा पोलीस ठाणे हद्दीत टाकुन दिले असल्याची कबुली त्यांनी दिली होती. त्यामुळे साडे तीन महिन्या पूर्वी झालेल्या खुनाला वाचा फुटली. 


Post a Comment

1 Comments