BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पारधी मुलांचा सन्मान Honor of Pardhi children

 


शिराळा :येथे पारधी समाजातील उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिराळा पोलिस ठाण्यातर्फेकरताना  पोलीस  निरीक्षक सिद्धेश्वर जंगम सोबत सुधाकर वायदंडे 

शिराळा,ता.३: पारधी समाजातील उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिराळा पोलिस ठाण्यातर्फे पोलीस  निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दलित महासंघाचे राज्याध्यक्ष व आदिवासी पारधी हक्क अभियानाचे नेते डॉ.सुधाकर वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती  होती.

      यावेळी   अमृता काळे,भरत पवार,इरशाद पवार,कोमल पवार,रचित पवार, संध्याराणी काळे, हिमालय काळे, दिकल पवार या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी  जंगम म्हणाले, पारधी समाजातील मुले शिकत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. परंतु या समाजातील मुला-मुलींनी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक प्रवाहात येणे गरजेचे आहे. पिढ्यानंपिढ्या गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दलित महासंघाचे प्रयत्न आहेत. त्याला पोलिस प्रशासनाची सर्वोतोपरी मदत राहील.

          सुधाकर वायदंडे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यानंतर शिक्षण तसेच इतर सर्व मूलभूत हक्कापासून वंचित असणाऱ्या पारधी समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी दिवंगत प्रा.मधुकर वायदंडे यांनी ४ जानेवारी २००१ रोजी दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाची स्थापना केली आहे. पारधी समाजातील शिक्षणाच्या अभावामुळे चुकीच्या रूढी,परंपरा,अंधश्रद्धा चालत आलेल्या आहेत.त्या बदलून या समाजाचे पुनर्वसन व्हावे, त्यांना गुन्हेगारीतून मुक्त करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाला कायम सहकार्याची भूमिका राहील .

           यावेळी दलित महासंघाचे सागर लोंढे,संतोष शिंदे,वैभव शिंदे  पारधी हक्क अभियानचे जितेंद्र काळे, टारझन पवार, इंद्रजित काळे,राकेश काळे,कादर पवार,जहांगीर पवार,चार्जिंग पवार, पक्षा काळे, घायल काळे, रोशना पवार, गुलछडी काळे, जागृती पवार उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments