BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोटार-ट्रॅक्टरच्या अपघातात युवक ठार| Youth killed in motor-tractor accident

 


शिराळा:  जत पासून  पाच किलोमीटरवर अमृतवाडी फाट्याजवळ  मोटारीने नांगरणीच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने मोटारीमधील  राजन युवराज नायकवडी (वय २७, ढोलेवाडी, ता.  शिराळा) हा  जागीच ठार झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले.गुरुवारी   मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.एकुलत्या एका मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नायकवडी कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 विजय ऊर्फ बंडू कृष्णदेव सांगोलकर (वय ४५, मंगळवेढा), गणेश गायकवाड (२६, आटपाडी), आकाश व्हनमाने (२३, सोलापूर), प्रदीप स्वामी (२३, जत) अशी जखमींची नावे आहेत. दोघांवर मिरजेच्या सिव्हिल रुग्णालयात,तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पेरणीचा ट्रॅक्टर मुचंडीहून जतच्या दिशेने निघाला होता. राजन नायकवडी हा मोटारीतून  शिराळ्याला निघाला होता. येथील अमृतवाडी फाट्याजवळ भरधाव मोटारीने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये राजन याचा मृत्यू झाला, चौघे गंभीर जखमी आहेत. राजन जत येथे आशीर्वाद गोल्ड लोन येथे नोकरीला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. राजन याच्या मागे आजी- आजोबा, आई-वडील, बहीण असा परिवार आहे. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.



Post a Comment

0 Comments