शिराळा:रस्त्याच्या उर्वरित अपूर्ण कामा संदर्भात आवश्यक तो भूसंपादनाचा प्रस्ताव लघु पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास आठ दिवसात मान्यतेसाठी पाठवण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना प्रशासनाने दिले. त्यामुळे गिरजवडे, मुळीकवाडी, मुंडेवाडी, घागरेवाडी येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालया समोर सुरु केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
गिरजवडे येथील मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम सध्या पुर्ण झाले आहे. हा प्रकल्प होण्यापूर्वी गिरजवडे ते कासेगाव हा मुख्य रहदारीचा रस्ता होता. मात्र धरण क्षेत्रात हा रस्ता बुडीत गेला आहे. या बुडीत रस्त्याला पर्यायी १९५० मीटरचा संपूर्ण नवीन रस्ता संबधीत विभागाकडून करण्याचे प्रस्तावित करणेत आले होते. सदर रस्त्याचे आरेखन निश्चीत करताना संबधीत शेतकऱ्याशी चर्चा करणेत आली होती. शेतकऱ्याऱ्यांशी चर्चा झालेनंतर रस्त्याचे काम सुरु करण्यात आले.त्यामध्ये ८५० मीटरच्या रस्त्याचे काम झाले. उर्वरित ३५० मीटर रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे.गेले काही वर्ष या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने गिरजवडे, घागरेवाडी, मुळीकवाडी, मोडेवाडी ग्रामस्थाना तसेच शालेय विद्यार्थ्याना आणि ज्योतिर्लिंग देवस्थान येथे येणाऱ्या भाविकाना येणे जाणेची प्रचंड गैरसोय होत आहे.अपूर्ण रस्ता कामासाठी वारंवार मागणी करून ही दाखल घेतली जात नव्हती.त्यामुळे नाईलाज म्हणून गिरजवडे, घागरेवाडी, मुळीकवाडी, मोंडेवाडी ग्रामस्थांच्यावतीने आज तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनास माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक यांनी भेट दिली.
तहसीलदार शामला खोत यांच्या दालनात उपविभागीय जलसंधारण अधिकारी जी. डी. गुरव, अभियंता एस. .एस. देवकर, रणधीर नाईक व आंदोलक यांच्या चर्चा झाली.यावेळी मुळीकवाडी ते घागरेवाडी, मुंडेवाडी रस्त्याचे उर्वरित अपूर्ण काम पूर्ण करणे संदर्भात आवश्यक तो भूसंपादनाचा प्रस्ताव लघु पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास आठ दिवसात मान्यतेसाठी सादर करण्याचे मान्य केले. रस्त्याच्या कामात राहिलेल्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येतील व रस्त्यावरती नव्याने मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात येईल. पाईपलाईन कामांमधील असणाऱ्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील वाढीव क्षेत्राचे संयुक्त मोजणी लवकरात लवकर करून घेऊन त्या संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात येईल अशी सकारात्मक चर्चा झाल्याने व लेखी दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी गिरजवडे सरपंच सचिन देसाई, शरद पाटील, महादेव पाटील, शिवाजीराव मोंढे, आनंदराव मोंडे, विजय पाटील, घागरेवाडी सरपंच विक्रम खोचरे, एम. टी .घागरे, मोहनराव मुळीक, बाळू मुळीक, सुखदेव मुळीक, आनंद मुळीक, सागर घागरे, अक्षय सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments