शिराळा ,ता.८:शिराळा तालुक्यातील एका गावात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीस लॉजवरील अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन अत्याचार व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी एका तरुणावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सदर तरुणीने शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
फोटोवर क्लिक करून सविस्तर बातमी वाचा
याबबत शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, अत्याचारित तरुणी ही मागासवर्गीय असून आरोपी तरुण हिंदु समाजाचा आहे.३ जुन २०२२ ते १५ नोव्हेंबर २०२२ व डिसेंबर २०२२ पर्यंत शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पिढीतेवर अत्याचार केला. सदर तरुणीने लग्न कधी करणार अशी विचारणा केली असता तु मागासवर्गीय समाजातील आहेस असे जातीवाचक व अपमानास्पद बोलुन लग्न करण्यास टाळाटाळ केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण करत आहेत.
0 Comments