BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा उत्तर भागात ढगफुटीसदृश पाऊस : शेतीचे नुकसान : अनेकांच्या घरात पाणी Torrential rain : loss of agriculture : water in many houses




 शिराळा,ता,८:शिराळा उत्तर भागातील पणुंब्रे , घागरेवाडी , गिरजवडे , शिवरवाडी , भैरवाडी भागात आज शनिवारी सायंकाळी   एक ते दिड तास ढगफुटीसदृश पाऊस झाला.त्यामुळे ओढ्याचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या घरात व शेतात  जाऊन नुकसान झाले आहे.

     सायंकाळी झालेल्या या मुसळदार पाऊसामुळे अवघ्या तासाभरात येथील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले . दुपार पासूनच विद्युत पुरवढा खंडित  झाला होता. या परिसरातील ओढे , नाले पाण्याने तुडुंब भरुन वाहू लागल्याने साधु येसू घागरे,जगन्नाथ  सखाराम घागरे. प्रकाश बाबा घागरे,रंगराव गुंगा पाटील यांच्या सह इतरांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे.शेतीचेही मोठे प्रमाणात नुकसान झाले . ओढ्याकडेच्या काही घरात पाऊसाचे पाणी शिरले . दुथडी भरुन वाहणाऱ्या ओढ्यातील पाण्याचा व्हिडिओ सोशेल मिडियावर चांगलाच व्हायरल झाले आहेत. सध्या या परिसरात शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी खरिप पिकांच्या पेरणीची कामे चालू आहेत . अचानक पडलेल्या पाऊसामुळे रखडलेल्या पेरण्या काही दिवसांसाठी लांबणीवर पडणार आहेत. मात्र या पावसामुळे उस पिकांना जीवदान मिळाले आहे. रात्री सायंकाळपासून  पावसाने दमदार सुरुवात केली आहे.

Post a Comment

0 Comments