BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

असा झाला राजेशचा खून This is how Rajesh was killed


 

शिराळा ,ता.१: खून करून  शिराळा येथे प्रवासी बॅगेतून टाकलेल्या मृताची ओळख पटली  आहे. हा खून  पत्नीवर चारित्र्याचा  संशय घेत मारहाण करत असल्याच्या कारणावरून करण्यात आला आहे. राजेश वसंतराव जाधव वय ५३  मुळगाव कुंडल सध्या रा. पलुस असे खून झालेल्या व्यक्तीने नाव आहे. खून प्रकरणी भाचा  देवराज ऊर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे वय २४ वर्षे व्यवसाय फरशी फिटींग रा. मुळगांव शेवाळेवाडी ता कराड सध्या  रा. रुक्मीनीनगर  सुभद्रा सदन बंगला ता. कराड जि. सातारा,मुलगी  साक्षी राजेश जाधव (साक्षी विनायक काळुगडे) ,पत्नी  शोभा राजेश जाधव दोघी रा.पलूस या  संशयितांना शिराळा  पोलिसांनी अटक केली. सांगली पोलिसांनी १२  दिवसात या खुनाचा उलगडा केला आहे. 

सोमवारी २० मे  रोजी सकाळी साडे नऊ च्या दरम्यान येथील बाह्य वळण रस्त्यावरील कापरी फाटा ते सुरले वस्ती दरम्यान असणाऱ्या पुला जवळ प्रवाशी  बॅग मध्ये  सतरंजी मध्ये गुंडालेलाला नायलॉन दोरीने गळा व शरीरास बांधून घातलेला सडलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आला.सदर घटनेची माहीती मिळताच तात्काळ पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली होती.त्यानंतर  सदर मृतदेहाची व त्याचे नातेवाईकांची ओळख पटवणेकरीता व अज्ञात आरोपीचे शोधाकरीता वेगवेगळी पाच तपास पथके तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. घटनास्थळी मिळुन आले प्रवासी बॅग व मयताचे अंगावरील कपडे तसेच जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील बेपत्ता व्यक्ती  या आधारे तपास चालु केला होता. हा  तपास अतिशय क्लीष्ट व गुंतागुंतीचा होता.  तरी ही जिद्द न सोडता अथक परीश्रम घेवुन मुंबई, पुणे, कोल्हापुर, सातारा इत्यादी ठिकाणी प्रवासी बॅगा बनवणाऱ्या कंपनीमध्ये माहीती घेतली. पलुस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता  व्यक्तींचा शोध घेत असताना  राजेश वसंतराव जाधव रा. पलुस यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करत  असताना राजेशचा भाचा  देवराज ऊर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे,मुलगी  साक्षी राजेश जाधव ,पत्नी  शोभा राजेश जाधव यांच्याकडे केलेल्या चौकशीत विसंगती आढळुन आली. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केलेची कबुली दिली . राजेश हा दारुचा व्यसनी होता. पत्नी शोभावर चारित्र्याचा  संशय घेत मारहाण करुन त्रास देता होता .याच कारणातून  फेब्रुवारी महीन्यात राजेशचा खून करुन त्याचे प्रेत शिराळा पोलीस ठाणे हद्दीत टाकुन दिले असल्याची कबुली त्यांनी दिली. 

 बॅग आणि बेपत्ता हाच तपासाचा धागा 

तपास पथके बॅगची माहीती घेत असता  एक बॅग पलुस येथे विक्री केल्याची  माहीती मिळाली. त्या नुसार बॅग विक्रेत्याकडुन बॅग घेणाऱ्याच्या  वर्णनावरुन रेखाचित्र तयार करुन त्या आधारे तपास सुरु केला.दरम्यान पलुस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता  व्यक्तींचा शोध घेत असताना राजेशच्या नातेवाईकांकडे चौकशी करत  असताना राजेशचा भाचा  देवराज ऊर्फ देव्या शेवाळे,मुलगी  साक्षी ,पत्नी  शोभा यांच्याकडे केलेल्या चौकशीत विसंगती आढळुन आली. त्याचवेळी खुनी हाती लागले.

 खुनाचा घटना क्रम 

१९ ,२०,२१ फेब्रुवारी राजेश व कुटुंबियांचे भांडण झाले.त्यामुळे रागाने  २१ फेब्रुवारी रोजी रात्री राहत्या घरी पत्नी , मुलगी व भाचा यांनी तोंडावर उशी दाबून ,गळा आवळून पुन्हा  गळा कापला..२२ फेब्रुवारी रोजी सकाळी मृतदेह बॅगेमध्ये भरून मोटारसायकल वरून भाच्यांने शिराळा येथे आणून टाकला.

 ती मी नव्हेच 

राजेशचा खून २१ फेब्रुवारी करण्यात आला.त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी पत्नी शोभा हिने पती बेपता असल्याची फिर्याद पलूस पोलीस ठाण्यात दिली. स्वतः खुनात सहभागी आताना ती मी नव्हेच म्हणून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न तिच्या अंगलटी आला. 

 रात्रंदिवस तपास यंत्रणा राबली 

 पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांचे नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, सतिश शिंदे ,हरिषचंद्र गावडे,  प्रविण साळुंखे, युवराज सरनोबत,अनिता मेनकर ,सिकंदर श्रीवर्धन, जयनाथ चव्हाण, गणेश खराडे,कुमार पाटील ,महेश गायकवाड,, कालीदास गावडे, नितीन यादव,संदिप पाटील, शरद जाधव,शरद बावडेकर,प्रशांत देसाई, अमर जाधव, शशिकांत शिंदे, शरद  पाटील, राहुल पाटील,सुनिल पाटील, नागराज मांगले यांनी गुन्हा उघडकीस आणणेस परीश्रम घेतले आहेत. पोलीस अधिक्षक यांनी  तपास पथकास उत्कृष्ट तपास केलेबाबत बक्षीस जाहीर केले आहे.चौकशीसाठी पाच पथकांच्या माध्यमातून रात्रंदिवस तपास यंत्रणा राबविण्यात आली होती. यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण ,शिराळा पोलीस अशा   २२ पोलीस कर्मचारी  अहोरात्र झटत होते.


 त्या तिघांना पोलीस कोठडी  फोटो वर  क्लिक करून वाचा आणखी सविस्तर  


Post a Comment

0 Comments