BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सात हजार पर्यटकांनी केले चांदोली पर्यटन Seven thousand tourists did Chandoli tourism

 



फोटोवर क्लिक करून अपघाताची बातमी वाचा 




गेले साडे सात महिन्या पासून चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकासाठी सुरु असल्याने दिवाळी सुट्टी,शालेय सहली व मे महिन्याची सुट्टी  मध्ये  अनेक पर्यटकानी चांदोली धरण, अभयारण्य ,गुढे पाचगणी पवनचक्की पठार पाहण्यासाठी  पसंती दिली.१५ ऑक्टोबर ते १० मे  २०२४ पर्यंत शालेय विद्यार्थ्यास इतर पर्यटक अशा  ६९०८ हून अधिक  पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला .आता पावसाळा सुरु झाल्याने व १५ जून पासून चांदोली  राष्ट्रीय उद्यान पर्यटकासाठी बंद होणार आहे.त्यामुळे पर्यटकांना फक्त चार दिवस पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. 

नुकत्याच   मे महिन्यात झालेल्या बुद्ध पौर्णिमेच्या पाणवठ्यावरील गणनेत बिबट्या १,गवे ९१ ,सांबर १६,रानकुत्री ३.ससे १९, पिसोरी /गेळा  १, भेकर १७ ,अस्वले ८ ,उदमांजर ५, माकड ५,साळिंदर २, मुंगुस ३, शेखरू ७ ,वाटवाघूळ २, चकोत्री ५, रानकोंबडा १२, घुबड २ ,सर्प गरुड २, मोर १०, पर्वती कस्तुर ६, पांढऱ्या गालाचा कटूरगा  ५,लाल बुडाचा बुलबुल १५,केसरी डोक्याचा कस्तुर २,धामण १,घोरपड १. रात्री पाणवठ्यावर  पाणी पिण्यासाठी आलेल्या २०० हून अधिक प्राण्यांची नोंद झाली आहे.चांदोली पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना पास देण्याची व्यवस्था जाधववाडी येथील वन्यजीव विभागाच्या नाक्या वरती केली आहे.त्यासाठी आधार कार्ड, लायसन्स,मतदान ओळखपत्र या पैकी एकाची गरज आहे. खासगी  बस असेल तर प्रत्येकाचे आधार कार्ड किवा इतर ओळखीचा पुरावा असणे गरजेचे आहे.शालेय सहलीसाठी शाळेचे पत्र आवश्यक आहे. 

 पर्यटन शुल्क 

बारा वर्षा खालील मुले - प्रत्येकी ५० रुपये 

प्रौढ व्यक्ती  -१०० रुपये .

गाईड शुल्क -२५०  रुपये 

वाहन प्रवेश - लहान १००,बस १५० 

छोटा कॅमेरा -५० ,मोठा १०० 

वन्यजीव विभागाचे वाहन असल्यास - प्रत्येक मुलांसाठी २०० रुपये (प्रवेश शुल्क ५० , बस शुल्क १००  ,गाईड ५० ).प्रौढ व्यक्ती   २५० रुपये ( प्रवेश शुल्क  १०० ,बस शुल्क १००  ,गाईड ५०).

पर्यटकांच्या भेटी 

१५ऑक्टोबर २०२३ ते ९ मे २०२४

प्रौढ व्यक्ती -५२७९

लहान मुले सहलीसह-१६२९

सहली संख्या -१२

खाजगी वाहने -७३१

एकूण पर्यटक -६९०८

पर्यटन गुरुवारी बंद 

प्रत्येक गुरुवारी पर्यटन बंद असते.त्यामुळे कोणाला ही आत सोडले जात नाही. पास सकाळी सहा ते दुपारी तीन पर्यत दिले जातात. सायंकाळी सहा नंतर पर्यटन बंद होते. दीपावली सुट्टीत पर्यटकांची संख्या जास्त होती.आता संख्या मर्यादित असली तरी पुन्हा मे च्या उन्हाळी सुट्टीत संखेत वाढ होईल.

काशिलिंग बादरे वनपाल मणदूर 





Post a Comment

0 Comments