शिराळा,ता.१३:वाकुर्डे बुद्रुक ता,शिराळा येथील ऋतुराज राजाराम जंगम याने २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेमध्ये ९० टक्के गुण मिळवले. त्याने भौतिकशास्त्र ,रसायन शास्त्र व जीव शास्त्र या ग्रुपला ९० टक्के गुण मिळवले असून नीट यु.जी परीक्षेमध्ये ७२० पैकी ६६७ गुण मिळवून एम.बी.बी.एस या वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र झझाला आहे.त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments