शिराळा :शिराळा उत्तर भागातील पणुंब्रे , घागरेवाडी , गिरजवडे , शिवरवाडी , भैरवाडी काल शनिवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शेतीचे बांध फुटून व वाहून जाऊन शेतात गाळ साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणत शेतीचे नुकसान झाले आहे. धूळवाफ पेरणी केलेल्या व भात उगवून आलेल्या शेतकऱ्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
काल सायंकाळी झालेल्या या मुसळदार पाऊसामुळे अवघ्या तासाभरात येथील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या परिसरातील ओढे , नाले पाण्याने तुडुंब भरुन वाहू लागल्याने साधु येसू घागरे,जगन्नाथ सखाराम घागरे. प्रकाश बाबा घागरे,रंगराव गुंगा पाटील यांच्या सह इतरांच्या घरात पाणी शिरून शिरले होते. सध्या या परिसरात शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी खरिप पिकांच्या पेरणीची कामे चालू आहेत . अचानक पडलेल्या पाऊसामुळे रखडलेल्या पेरण्या काही दिवसांसाठी लांबणीवर पडणार आहेत. मात्र या पावसामुळे उस पिकांना जीवदान मिळाले आहे.
पणुंब्रे तर्फ शिराळा येथील डोंगर पायथ्याशी असणाऱ्या शेतात डोंगरातून आलेल्या पाण्यामुळे सुमारे साडे तीन ते चार एकर शेतातील बांध फुटून गाळ साठला आहे. त्यामुळे नुकतीच भाताची केलेली धुळवाफ पेरणी वाया गेल्याने पुन्हा शेती व्यवस्थित करून बांध व ताली घालून दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.यामध्ये गंगाराम गणू चौगुले, रामचंद्र पाटील, लक्ष्मण चंद्रु पाटील ,पुतळाबाई पाटील, संतोष आत्माराम पाटील, रंगराव आण्णा पाटील, पांडुरंग अंतु पाटील, तुकाराम बळवंत पाटील,प्रकाश सिताराम पाटील,खंडेराव चौगुले,आनंदा चौगुले ,तानाजी श्रीपती पाटील, शिवाजी चौगुले, वसंत लखु पाटील, लक्ष्मण मारुती पाटील या शेतकऱ्यांचा समवेश आहे.गिरजवडे येथील मोहन मुळीक ,हणमंत मुळीक,बाळू मोंडे यांच्या सह इतरांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.
ढगफुटी सारख्या झालेल्या पावसाने धूळवाफ पेरणी झालेल्या शेतातील बांध आणि ताली तुटल्या असून काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणत गाळ साचला आहे.त्यामुळे आम्हाला दुबार पेरणी करावी लागणार आहे. आमच्या झालेल्या नुकसानीचे शासनाने करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी.
शिवाजी चौगुले शेतकरी
0 Comments