BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पोलीस कोठडी संपली पुढे काय Police custody is over, what next?



 शिराळा ,ता.११:राजेश वसंतराव जाधव (वय ५३ ) रा.पलूस मुळगाव कुंडल  याचा  खून करून प्रवाशी बॅगेतून  मृदेदेह शिराळा येथे टाकल्या प्रकरणी १० दिवसाची पोलीस कोठडी मिळालेल्या भाचा देवराज ऊर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे, मुलगी साक्षी राजेश जाधव, पत्नी  शोभा राजेश जाधव दोघी (रा.पलूस ) या तीन  संशयितांना शिराळा  पोलिसांनी  शिराळा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

सोमवारी २० मे  रोजी सकाळी साडे नऊ च्या दरम्यान येथील बाह्य वळण रस्त्यावरील कापरी फाटा ते सुरले वस्ती दरम्यान असणाऱ्या पुला जवळ प्रवाशी  बॅग मध्ये  सतरंजी मध्ये गुंडालेलाला नायलॉन दोरीने गळा व शरीरास बांधून घातलेला सडलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आला.सदर घटनेची माहीती मिळताच तात्काळ पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली होती.आरोपीच्या  शोधाकरीता वेगवेगळी पाच तपास पथके तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती.  जिद्द न सोडता अथक परीश्रम घेवुन मुंबई, पुणे, कोल्हापुर, सातारा इत्यादी ठिकाणी प्रवासी बॅगा बनवणाऱ्या कंपनीमध्ये माहीती घेतली.



 तपास पथके बॅगची माहीती घेत असता  एक बॅग पलुस येथे विक्री केल्याची  माहीती मिळाली. त्या नुसार बॅग विक्रेत्याकडुन बॅग घेणाऱ्याच्या  वर्णनावरुन रेखाचित्र तयार करुन त्या आधारे तपास सुरु केला.दरम्यान पलुस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता  व्यक्तींचा शोध घेत असताना  राजेश वसंतराव जाधव रा. पलुस यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करत  असताना राजेशचा भाचा  देवराज,मुलगी  साक्षी ,पत्नी  शोभा यांच्याकडे केलेल्या चौकशीत विसंगती आढळुन आली. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता  राजेश हा दारुचा व्यसनी होता. पत्नी शोभावर चारित्र्याचा  संशय घेत मारहाण करुन त्रास देता होता .याच कारणातून  फेब्रुवारी महीन्यात राजेशचा खून करुन त्याचे प्रेत शिराळा पोलीस ठाणे हद्दीत टाकुन दिले असल्याची कबुली त्यांनी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली असता १० दिवसाची पोलीस कोठडी सुनवली होती.ती मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात आज हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 



Post a Comment

0 Comments