चिखली ता. शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्ष लागवड करताना संचालक विराज नाईक सोबत कार्यकारी संचालक अमोल पाटील,सचिव सचिन पाटील.
शिराळा,ता.५ :सर्वत्र वाढत चाललेले तापमान नियंत्रीत करणेसाठी व पर्यावरणाचा समतोल राखणेसाठी जास्ती जास्त वृक्षारोपण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संचालक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष विराज नाईक केले.
चिखली ता. शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आली. त्यावेळी बोलत होते.यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पिंपळ, चिंच, लिंब, मेडसिंग, करंज, जांभळ या प्रजातीतील वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी कारखान्याचे सचिव सचिन पाटील, चीफ अकौंटंट भानुदास पाटील, शेती अधिकारी आनंदराव पाटील, संगणक विभाग प्रमुख प्रकाश पाटील, खरेदी विभाग प्रमुख राजेंद्र पाटील, दिनकर महिद, संदीप पाटील, संजय नाईक, प्रकाश पाटील, शंकर येवले, शिवाजी इंगवले, आनंदा डिसले, महादेव पाटील, संदीप पाटील, विजय देसाई, पर्यावरण अधिकारी शरद पाटील व पर्यावरण विभागाचे व कारखाना कर्मचारी उपस्थिती होते.
➖➖➖➖
0 Comments