कोकरुड :सय्यदवाडी (ता. शिराळा) येथील विवाहिता कविता बाबूराव आस्कट (वय ४० ) हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघड़कीस आली. याबाबत बाबूराव ज्ञानदेव आस्कट यांनी कोकरुड पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत कोकरुड पोलिसानी दिलेली माहिती अशी की, गुरुवार ६ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कविता ही घरातून अचानक गायब झाली होती. सय्यदवाडी सह परिसरात शोध घेतला. नातेवाईक यांच्या कडे चौकशी केली. मात्र आढळून न आल्याने शुक्रवारी कोकरुड पोलिसात बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी बाबासो तुकाराम आस्कट यांच्या विहिरी मध्ये कविता यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. कविता यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास कोकरूड पोलीस करत आहेत.
0 Comments