BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गुणवंत मुलांचा सत्कार Honoring meritorious children

भाटशिरगाव (ता.शिराळा) येथे ज्योतिर्लिंग मंदिरात गुणवंत विध्यार्थांचा सत्कार करताना  गणेश अलुगडे,समाधान देसाई व इतर 

 शिराळा,ता.७: भाटशिरगाव( ता.शिराळा) येथे ज्योतिर्लिंग मंदिरात बारावी परीक्षेत वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव चा निकाल शंभर टक्के लागल्या बद्दल विध्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार ग्रामस्थांच्यावतीने  करण्यात आला. 

यावेळी  शिराळा तालुक्यात कला शाखेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या प्रणाली बाजीराव पाटील व  तृतीय क्रमांक मिळवलेल्या  पल्लवी संपत देसाई ,विश्वजीत माने यांचा इयत्ता दहावी परीक्षेत विद्यालयात तृतीय क्रमांक संपादित केल्याबद्दल  सत्कार त्यांच्या आई वडिलांच्या समवेत करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक ए.सी. सदावर्ते म्हणाले,  विद्यार्थ्यांच्या भरीव कामगिरी मध्ये विद्यालयातील प्राध्यापक एस. डी .जमदाडे , व्ही. डी. पाटील,पी .एस. सुतार  यांचे योगदान आहे. प्रा. बी. एम. नलवडे यांनी कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती साठी सुरु असणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.एस. बी. दिवे, ए. बी साळुंखे, गणेश आलुगडे,  कैलास देसाई  संजय अलुगडे यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी धोंडीराम देसाई, संपत देसाई, अभिजीत देसाई, महादेव माने, दिलीप देसाई, बाजीराव पाटील, अंकुश देसाई ,संजय देसाई, अनिल लुगडे, विजय देसाई ,पंडित पाडळकर, सचिन गुरव, नामदेव आलुगडे, कैलास देसाई, गणेश लुगडे, समाधान देसाई, संजय लुगडे उपस्थित होते.  सूत्रसंचालन व्ही. डी .पाटील  यांनी केले. आभार  एस.एच .इंगवले  यांनी मानले.


Post a Comment

0 Comments