BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सर्वांना आकर्षण वाटणारा -अस्वल प्राणी Everyone's favorite animal is the bear



 चांदोली राष्ट्रीय उद्यानात नुकत्याच २३ मे च्या बुद्ध पौर्णिमेच्या पाणवठ्यावर झालेल्या गणनेत निसर्ग प्रेमींना ८ अस्वले  आढळून आले आहेत.  अस्वलाच्या गुदगुल्या असा शब्द प्रयोग  सर्रास वापरला जात असल्याने या अस्वल प्राण्याबद्दल सर्वांचा आकर्षण आहे. 

अस्वल डोक्यापासून शरीराची लांबी १.४- १.८ मी.; शेपूट १०-१२ सेंमी.; खांद्यापाशी उंची ६०-९० सेंमी.; वजन सामान्यत: ९०-११५ किग्रॅ. एवढे असते. मादीपेक्षा नर आकाराने मोठा असतो. मुस्कट लांब, मोठे डोके आणि खुंटीसारखी शेपटी असते. मागचे पाय आखूड, जाड असतात; तर पाऊल मोठे व पाच बोटांचे असते. प्रत्येक बोटांवर नख्या असून त्या पुढच्या पावलांवर लांब असतात. अन्नाचे चर्वण करण्यासाठी अस्वलाचा जबडा पसरट व दात सपाट असतात. त्याशिवाय चार लांब सुळे असतात. त्वचा सैल असून अंगावर लांब व दाट काळे केस असतात. या रंगात पुष्कळदा तपकिरी छटा असते. अस्वलाची ज्ञानेंद्रिये अतिशय तीक्ष्ण असतात; तर दृष्टी क्षीण असते आणि त्याला ऐकायला कमी येते.त्यांची शरीरे मोठी असून पाय मात्र छोटे असतात. इतर मांसाहारी प्राण्यांप्रमाणे ते टाचांवर चालत नाहीत तर पूर्ण पायांवर चालतात. त्यांच्या मागील बळकट पायांवर ते उभे राहू किंवा बसू शकतात. धोका जाणवल्यावर किंवा वास घेण्यासाठी ते मागील दोन पायांवर उभे राहतात. त्यांची दृष्टी कमकुवत असते त्यामुळे वास घेऊन त्यांना आपला मार्ग शोधून काढावा लागतो. मात्र, त्यांचे नाक खूप तीक्ष्ण असते आणि ते खाद्य शोधण्यासाठी या नाकावरच अवलंबून असतात. भारतात आढळणाऱ्या तपकिरी अस्वला (Brown Bear) ला जवळजवळ १ ते दीड किलोमीटर अंतरावरून येणारा वास ओळखता येतो. अस्वले सर्वभक्षक  प्राणी आहेत. ते मांस, मासे, फळे, किडे, मुळे आणि वाळवी खाऊन जगतात. हिवाळ्यापूर्वी ते अतिरिक्त चरबी साठवून ठेवतात आणि हिवाळ्यात झोपेत असतात.वनातील कोणतीही निवार्‍याची जागा त्यांना  राहायला आवडते. ते निशाचर आहे. भक्ष्य मिळविण्यासाठी ते संध्याकाळी बाहेर पडते. पहाटे निवासस्थानी परतते. फळे, फुले, कीटक, मध आणि कधीकधी कुजके मांस हे भारतीय अस्वलाचे खाद्य आहे. त्यांना मध आवडतो. झाडावर चढून मधाने भरलेले पोळे ते खाली पाडते आणि मध खाते. वाळवीची वारुळे फोडून त्यातील वाळवी ते खाते. ते  झोपेत मोठ्याने घोरते.

ती  कळपाने न राहता एकेकटी राहतात. त्यांच्या समागमाचा काळ उन्हाळा असतो. सात ते नऊ महिन्यांच्या गर्भावधीनंतर डिसेंबर-जानेवारीत मादीला १ किंवा २ पिल्ले होतात. ती दोन-तीन महिन्यांची झाल्यावर आईच्या पाठीवर बसून बाहेर जाऊ लागतात. तीन वर्षांपर्यंत ती आईबरोबरच असतात. आईच या पिलांचे संरक्षण करते. या जातीत नर-मादी एकनिष्ठ आढळतात. त्यांचे आयुष्य २५ ते ४० वर्षांचे असते. सर्व अस्वले चटकन चिडतात आणि धोकादायक असतात. पंजाच्या एका फटक्यानिशी ते एखाद्या व्यक्तीला ठार करू शकते. त्याच्या अंगावर दाट केस असतात. पावलांच्या तळव्यावरदेखील दाट केस असल्यामुळे बर्फावर चालताना त्याला फार त्रास होत नाही.

अस्वलांची काही वैशिष्ट्ये येथे आहेत:

  • लांब, दाट फर: अस्वलाला थंड हवामानापासून वाचवण्यास मदत करणारे लांब, दाट फर असते. फर रंग प्रजातींमध्ये बदलू शकतो, परंतु काळा, तपकिरी, लालसर तपकिरी आणि पांढरा यासह सर्वात सामान्य रंगांमध्ये समाविष्ट आहे.

  • मजबूत पंजे: अस्वलाचे मजबूत पंजे त्यांना चढण्यास, खणण्यास आणि त्यांचे शिकार पकडण्यास अनुमती देतात. त्यांच्या पायांवर लांब, वक्र पंजे देखील असतात जे त्यांना बर्फ आणि बर्फावरून चालण्यास मदत करतात.

  • लांब, टोकदार नाक: अस्वलांची लांब, टोकदार नाके त्यांना अन्न शोधण्यास मदत करतात, जमिनीखाली लपलेले कीटक आणि मुळे देखील. त्यांची चांगली गंधाची भावना देखील असते, जी त्यांना अंधारात किंवा बर्फाखाली देखील अन्न शोधण्यास अनुमती देते.

  • सर्वभक्षी: अस्वल सर्वभक्षी आहेत आणि ते विविध प्रकारचे अन्न खातात, ज्यात फळे, भाज्या, कीटक आणि लहान प्राणी यांचा समावेश होतो. ते उत्कृष्ट शिकारी देखील आहेत आणि ते मासे, हरण आणि इतर मोठे प्राणी पकडू शकतात.

  • एकाकी: अस्वल एकान्त प्राणी आहेत आणि ते बहुतेक वेळ एकटे घालवतात. तथापि, काही प्रजाती, जसे की अमेरिकन ब्लॅक बेअर, सामाजिक आहेत आणि ते लहान गटांमध्ये राहू शकतात.

Post a Comment

0 Comments