शिराळा,ता.११:कायदा व सुव्यवस्था राखत बकरी ईद सणाचे महत्व जोपासून हा सण शांततेत साजरा करा असे आवाहन शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी केले.
शिराळा पोलीस ठाणे येथे बकरीईद सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी जंगम म्हणाले,शिराळा परिसरात अनेक सण उत्सव हिंदू -मुस्लीम बांधावांच्यावतीने मोठ्या उत्साहात व शांततेत साजरे केले जातात. वर्षागणित साजऱ्या होणाऱ्या सणांना अनेक अर्थानी महत्व आहे. हे महत्व सर्वानीच अबाधित राखने गरजेचे आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद सण १७ रोजी साजरा होणार आहे. त्यामुळे हा सण शांततेत साजरा करून या सणाचे महत्व जोपासत प्रशासनालाही सहकार्य करावे.
यावेळी शांतता कमिटीतील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर समर्पक उत्तर देण्यात आली.यावेळी शिराळा मुस्लिम संघटनेचे डी.जी.आत्तार,रफिक आत्तार,मैहबूब मुल्ला,खलील मोमीन, सरदार पठाण ,दिलावर मोमीन,फिरोज मुजावर, के.आर.पठाण, सिकंदर पठाण, हमीद मुल्ला, महबुब मुल्ला, फारुख मुल्ला, अस्लम नदाफ , तौसिफ पिरजादे,शिराळा पोलिस ठाण्याचे गोपनीय अधिकारी सुनील पाटोळे ,हवालदार सुनील पेठकर,,यांच्यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments