शिराळा,ता.३०: येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर संपन्न झाले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून झाले. याप्रसंगी गटविकास अधिकारी संतोष राऊत, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे, सांगलीचे सहाय्यक आयुक्त (रोजगार) जे. बी. करीम, संस्था व्यवस्थापन समिती शिराळाचे अध्यक्ष दादासाहेब पाटील उपस्थित होते. शिबिरात दहावी, बारावी नंतरच्या करिअर संधी यासंदर्भात नानासाहेब महाडिक शिक्षण समूह पेठचे कार्यकारी संचालक, प्रा. महेश जोशी व व्यक्तिगत विकास रोजगाराच्या संधी याबाबत प्रेस क्लब शिराळाचे अध्यक्ष विनायक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले . प्राचार्य एस. आय. भोसले, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एम. डी. जोशी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments