शिराळा: पावसाला सुरुवात झाल्यानंतर अपघात, अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी चांदोली धरण पर्यटकांसाठी आज ११ जून पासून बंद करण्यात आले आहे..
यंदा मॉन्सूनने जूनलाच चांदोली परिसरात दमदार हजेरी लावल्याने चांदोली धरण पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली. पर्यटकांनी नोंद घेण्याचे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले.चांदोली धरणात सध्या ३०.१६ टक्के, म्हणजेच १०.३८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणीसाठ्यापैकी ३.५० टीएमसी उपयुक्त आहे. आणखी किमान एक महिना पुरेल इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध असल्याने पाऊस काही काळ लांबला तरी पाणी टंचाई भासणार नसल्याची स्थिती आहे.
0 Comments