शिराळा ,ता.१५:सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे चांदोली येथील जंगल सफारी पर्यटकांसाठी पावसाळा कालावधीत सोमवारी १७ जून ते १५ ऑक्टोंबर या चार महिन्याच्या कालावधीत बंद राहणार असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र राखीव ढेबेवाडीचे वनक्षेत्रपाल डी.जी.राक्षे यांनी दिली.
यावेळी राक्षे म्हणाले, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना नुसार पावसाळ्याच्या कालवधी मध्ये व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील पर्यटन बंद असते.या वर्षाचा पर्यटन हंगाम १६ जून रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणे पावसाळ्याच्या ४ महिने कालावधीसाठी चांदोली पर्यटन बंद राहणार आहे. पावसाळ्यात मध्ये जंगालातील कच्चे रस्ते व नाले यामुळे वाहनांच्या येण्या जाण्यावर अडथळा निर्माण होतो.अशा वेळेस कच्चे रस्ते खराब होतात. त्यामुळे पावसाळ्यात राष्ट्रीय उद्याने बंद ठेवण्यात येते. जंगालातील जैवविधतेला वाहनांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. पावसाळा हा लहान जीव, सरपटणारे प्राणी आणि इतर वन्यजीवांचा प्रजाननाचा कालावधी असतो .या कालावधी मध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठीसुद्धा पर्यटन बंद ठेवली जातात. महाराष्ट्रतील सहा व्याघ्र प्रकल्प पैकी एक असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्र मधील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये निर्सग पर्यटनासाठी ७ निसर्ग पर्यटन झोन असून दर वर्षी पर्यटन हंगामा मध्ये राज्यातील विविध ठिकाणावरून पर्यटक व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येत असतात. पर्यटन हंगामा मध्ये व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात पर्यटकांच्यासाठी जंगल सफारी, ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण गडकिल्ले व परिसरातील निसर्ग सौंदर्य, वृक्ष संपदा आणि विविध वन्यप्राणी पाहण्याची संधी उपलब्ध असते. या वर्षीच्या पर्यटन हंगामा मध्ये साधारणपणे साडे सात हजाराहून अधिक पर्यटकांनी चांदोली येथे भेट देऊन निसर्ग पर्यटनाचा आंनद घेतला आहे.तरी सर्व पर्यटकांनी पावसाळ्याच्या कालावधी मध्ये चांदोली पर्यटन बंद राहणार असल्याची ची नोंद घ्यावी.
0 Comments