शिराळा,ता.२१:येथील बाह्य वळण रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिरा जवळ मोटरसायकल व चारचाकी गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार संतोष उत्तम ताईंगडे ( वय ३५, रा.तळमावले ता.पाटण , जि. सातारा) हा युवक ठार झाला. ही घटना शुक्रवार २१ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत फिर्याद प्रीतम प्रदीप हसबनीस दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की ,संतोष ताईंगडे हे मांगले येथील मित्राला भेटण्यासाठी मोटारसायकल वरून निघाले होते. यावेळी करण हरिभाऊ सोमोशे ( वय २५ , रा.पलूस ) हे कोकरूड कडून पलूस कडे चारचाकी गाडी घेवून निघाले होते. यावेळी या दोन्ही गाड्यांची धडक झाली.यामध्ये मोटारसायकलस्वार संतोष ताईंगडे यांचा मृत्यू झाला. पुढील तपास शिराळा पोलीस करीत आहेत.संतोष मुंबई येथील खाजगी कंपनीत फार्मासिस्ट म्हणून नोकरीस होते. त्यांच्या पश्चात आई ,वडील,पत्नी,एक मुलगी असा परिवार आहे.
0 Comments