शिराळा,ता.२२:इंगरुळ (ता. शिराळा ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर मालवाहतूक टेम्पोतून कत्तल करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या दोन गायी , रेडकू , वासरे अशी सहा जनावरे नेत असताना युवकांनी पकडून त्यांना शिराळा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी प्रमोद तानाजी माने ,संदीप संजय लोंढे (दोघे रा. पेठवडगांव ता. हातकणंगले जि कोल्हापुर ), हुसेन अहमद मुल्ला (रा. इंगरुळ ता. शिराळा)तीन संशयितांच्या गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवार रोजी सकाळी साडे अकरा च्या दरम्यान घडली.याबाबत पोलीस हवलदार सूर्यकांत रघुनाथ कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिराळा पोलीस व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की , मालवाहतूक टेम्पो मधून दोन गायी , रेडकू व वासरे कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती बजरंग दल, विश्व हिदू परिषदचे ऋषिकेश भोसले, अविनाश पाटील, दर्शन जोशी, पृथ्वीराज उर्फ राहुल गायकवाड ,प्रशांत कानकात्रे ,भिकाजी सावंत, रोहन म्हेत्रे ,सोमनाथ परीट, सागर कुरणे, अभिजीत पाटील, वैभव तेली ,प्रथमेश गायकवाड ,शिवकुमार आवटे, अक्षय कवठेकर, ओमकार पाटील, रोहित क्षीरसागर, सुनील गायकवाड, अखिलेश पाटील यांना समजली. त्यावेळी सादर युवकांनी तो टेम्पो अडविला.त्यावेळी टेम्पोतील गायी व वासरे कत्तलखान्यात नेण्यासाठी भरली आहेत याची खात्री करून हा टेम्पो त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिला.
यानंतर गायी वासरे, जनावरे दाटीवाटीने कोंबुन, बेकायदा बिगर परवाना अवैध रित्या क्षमतेपेक्षा जास्त भरुन, त्यांना चारा पाणी न देता ,त्यांची योग्य ती काळजी न घेता व औषधोपचार न देता जनावरे भरुन प्राण्यांना निर्दयतेने वागणुक देहुन अवैद्यपणे कत्तलीकरिता दोन लाख पंधरा हजार रुपयांच्या मुद्देमालासह वाहतुक करताना आढळून आल्याने टेम्पो ताब्यात घेतला.पुढील तपास हवालदार भूषण महाडिक हे करीत आहेत.टेम्पोतील सहाही जनावरे कराड येथील गोशाळेमध्ये पाठवण्यात आली आहेत.
0 Comments