BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या कुटुंबाला घरकुल मंजूर |A house is granted to that family

 


माळेवाडी ता.शिराळा येथील  सुवर्ण दिंडे,विद्या दिडे, कु.प्रसाद दिंडे,अथर्व दिंडे ही चार भावंडे अनाथ झाली आहेत.त्या  दिंडे कुटुंबाला भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख भाऊ यांच्या प्रयत्नातून शासनाच्या यशवंत घरकुल व अपंग घरकुल योजनेमधून दोन घरकुल मंजूर करण्यात आली. या मंजुरीचे पत्र माळेवाडी येथे दिंडे कुटुंबीयांच्या घरी प्रत्यक्ष भेटून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे,गटविकास अधिकारी संतोष राऊत यांच्या उपस्थितीत दिले.दिंडे कुटुंबीयांना घरकुलांच्या माध्यमातून झालेल्या मदतीबद्दल समाजात समाधान व्यक्त होत आहे. या कुटूंबियाला आर्थिक सहाय्य करण्यात आले.

   बालकांच्या वडीलांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. आजी वयोवृद्ध झाल्याने मयत झाली आहे.यामुळे या चार मुलांना कोणाचा आधार नाही. चुलते व चुलती अपंग आहेत. त्यामुळे त्यांना मर्यादा आहेत.या दिंडे कुटुंबाला राहण्यासाठी असलेले घर देखील पडके आहे. अशा गंभीर परस्थितीतून हे कुटूंब जात आहे. ही बाब लक्षात घेवून सत्यजित देशमुख यांनी  जिल्हा परिषद सांगली प्रशासनाला आवाहन करत या कुटूंबाला शासन योजनेतून घरकुल  मंजूर करण्यासाठी विनंती केली. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी तात्काळ कारवाई करत दिंडे कुटुंबीयांना यशवंत घरकुल मधून प्रसाद दिंडे  यांना तर अपंग योजनेतून चुलते बाबासाहेब दिंडे यांना घरकुल मंजूर करून या मंजुरीचे प्रत्यक्ष पत्र देण्यात आले. आता दिंडे कुटुंबीयांना घराचा आधार मिळणार आहे.

       यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी संतोष राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील,  विकास नांगरे,अंकुश नागरे, सरपंच सुरेखा चाळके, उपसरपंच राजाराम नांगरे,  ग्रामसेवक हिंदुराव पाटील, लक्ष्मण नांगरे,  मोहन जाधव, राजू जाधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments