शिराळा,ता.१०: शाहुवाडी तालुक्यातील चहा टपरी, हॉटेल, ढाबे, चायनिज खादयपदार्थाचे हातगाडे या ठिकाणी घरगुती वापराचे सिंलेडरचा वापर होत असलेचे निदर्शनास आले.त्यामुळे मंडल निहाय जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ अंतर्गत पथकाने टाकलेल्या धाडीत ५९ सिलेंडर धारकावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत उपविभागीय अधिकारी, पन्हाळा यांनी तहसीलदार यांना निर्देश दिले होते.त्या नुसार तहसीदार रामलिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर,बांबवडे,सरूड, आंबा या चार मंडल अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांची पथके तयार करण्यात आली आहे. त्या माध्यमातून चहा टपरी, हॉटेल, ढाबे, चायनिज खादयपदार्थाचे हातगाडे या ठिकाणी घरगुती वापराचे सिंलेडरचा वापर होत असलेचे आढळून आले. त्यामध्ये मलकापूर-१८ ,बांबवडे-२१ ,सरूड-१० , आंबा- १० असे एकूण ५९ सिलेंडर जप्त केले आहेत.
0 Comments