शिराळा :खून करून बॅगेत भरलेला मृतदेह अंधार पडत असल्याने आंबा घाटा ऐवजी शिराळा येथे टाकल्याने ९० दिवसाने खुनाला वाचा फुटली अन चाणक्ष पोलिसांनी १०० व्या दिवशी मारेकऱ्यांच्या मस्क्या आवळल्याने प्रवासी बॅगेत असणाऱ्या मृतदेहाच्या खुनाचा उलगडा झाला.भाच्याने दोरीने गळा आवळला,मुलगीने तोंडावर उशी दाबून धरली,पत्नीने दोन्ही पाय धरले.तरी ही राजेशची धडपड सुरु राहिल्याने शेवटी मामीने भाच्याच्या हातात सूरी दिल्याने त्याने मामाचा गळा चिरायला अन जिवाच्या आकांताने सुरु असणारी राजेशची धडपड अखेर थांबली. ही चित्त थरारक कहाणी आहे पलूस येथील खून झालेल्या राजेश वसंतराव जाधव याची.
राजेश जाधव हा मुळचा कुंडलचा असला तरी त्याचे वस्तव्य पलूसला होते. तो व्यसनाच्या आहारी गेला होता. सुशिक्षित कुटुंब असल्याने त्याचे असे नशेत घरी येणे ,भांडण काढून पत्नीवर संशय घेवून तिला त्रास देणे हे दिवसेंदिवस वाढू लागले. राजेशचा भाचा देवराज हा अधून मधून मामाकडे येत असेल्याने मामाची घरात सुरु असणारी रोजची कटकट तो पाहत होता. त्याच्याकडे येथे राहत असल्याचे भाडे ही मागत असे .याच कटकटीतून सुटका करण्याचा विचार राजेशच्या पत्नी शोभा,मुलगी साक्षी व भाचा देवराजच्या मनात आला.२१ फेब्रुवारी रोजी रात्री त्याचा खून केल्याने मृदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार त्यांच्या मनात सुरु झाला. कुठे तरी दूर घाटात टाकण्याचा निर्णय झाला. दुसऱ्या दिवशी मृतदेह ताठ झाल्याने त्याचे पाय बॅगेत भरण्यासाठी वाकत नव्हते. देवराज हा फरशी फिटींगचा व्यवसाय असल्याने त्याच्या अवगत ज्ञानानुसार मृतदेहाचे ग्राईडरने तुकडे करून ते सतरंजीत गुंडाळून बॅगेत भरले. त्यासाठी पलूस येथून मोठी नवीन प्रवाशी बॅग देवराजने खरेदी केली. मोठी बॅग कशाला असे विक्रेत्याने विचारले असता बालाजीला जाणार असल्याचे सांगितले. या मृतदेहाची विल्हेवाट आंबा घाटात करण्याची कल्पना राजेश ची मुलगी साक्षी ची होती.त्या नुसार ती बॅग मामाच्याच मोटरसायकलवर घेवून भाचा मृतदेह आंबा घाटात टाकण्यासाठी दुपारी बाहेर पडला. शिराळ्यात पोहचला त्यावेळी अंधार पडला पडल्याने त्याने गुगल मॅप वर आंब्याचे ठिकाण पाहिले असता लांब असल्याने शिराळा येथेच बाह्यवळण रस्त्याने जात आताना कापरी फाटा ते सुरलेवस्ती दरम्यान असणाऱ्या पुला जवळ कोणी नसल्याचे पाहून छोट्या पुलावरून बॅग टाकून पलायन केले.
बॅग नवीन असल्याने व मृतदेह सतरंजीत गुंडाळल्याने तीन महिने बाहेर दुर्गंधी पसरली नाही. २० मे रोजी शिराळा येथे एका प्रवाशी बॅग मध्ये सडलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आला. श्वान पथक,ठसे तज्ज्ञ ,फॉरेनसिक व्हॅन यांच्या हाती ठोस पुरावा लागला नाही. त्यावेळी बॅग एका बाजूने व्यवस्थित कट केलेली दिसली. बॅग कट केल्यानेच बाहेर दुर्गंधी पसरली. पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकुण पाच तपास पथके तयार केली . घटनास्थळी मिळुन आले प्रवासी बॅग,टी शर्ट ,कमरेचा पंचरंगी दोरा व जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील बेपत्ता व्यक्ती या आधारे तपास चालु केला. मुंबई, पुणे, कोल्हापुर, सातारा इत्यादी ठिकाणी प्रवासी बॅगा बनवणाऱ्या कंपनीमध्ये माहीती घेतली. त्यावेळी पुण्यातून पलुस येथे बॅग विक्री केल्याची माहीती मिळाली. त्याच दरम्यान पलूस येथील बेपत्ता असलेल्या राजेशच्या नातेवाईक यांच्याकडे संशयाची सुई फिरली. राजेशच्या कमरेला पंचरंगी दोरा असल्याची माहिती त्याच्या मित्राने पोलिसांचा दिल्याने आणखी संशय बळावला. त्या नुसार राजेशचा भाचा देवराज,मुलगी साक्षी ,पत्नी शोभा यांच्याकडील चौकशीत विसंगती आढळुन आली. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केलेची कबुली दिल्याने खुनाचा उलगडा झाला.
एका बॅगेसाठी १५ बॅगेचा तपास
इचलकरंजी येथे अशा प्रकरची बॅगे तयार करतात असे समजले खात्री केल्यावर गुड लक हा आमचा लोगो नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुणे ,मुंबई येथे चौकशी केली असता पुणे येथे एका कंपनीत १६ बॅगे एक दीड वर्षा पूर्वी तयार केल्या होत्या.१२ ची विक्री होलसेल दरात झाली होती. उर्वरित चार पैकी पुणे येथे उत्तर प्रदेशच्या एकाने खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची पुण्यात चौकशी केली असता तो कुटुंबासह उतर प्रदेशाला गावी गेलायचे समजले.त्याची माहिती काढली असता ती बॅगे असल्याचे समजले.तो परत पुण्यात बॅगेसह आल्याने त्याच्यावरील संशय निवळला .एका बॅगेसाठी १६ पैकी उर्वरित १५ बॅगेचा तपास केला आहे.
चार बेपत्ता सापडले
या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सांगली,कोल्हापूर ,सातारा,पुणे ,मुंबई व इतर ठिकाणी ५०० बेपत्ता लोकांची माहिती मिळाली. त्यांचा शोध घेत असताना आष्टा,इचलकरंजी ,कोडोली,कराड येथील चार बेपत्ता असणारे सापडले.
म्हणून संशय बळावला
राजेशचा २१ तारखेला खून केला. २२ ला मृतदेह फेकला. २३ ज्या गादीवर राजेशचा खून केला ती रक्ताने माखलेली गादी २३ ला बाहेर पुलाखाली टाकली, त्या नंतर २८ रोजी राजेश बेपत्ता असल्याची पलूस पोलीस ठाण्यात पत्नी ने नोंद केली. राजेशची पत्नी व मुलगी कोल्हापूर येथे राह्यला गेली .मात्र त्या नंतर तीन महिन्यात त्यांनी एक वेळ ही राजेश बद्दल पोलिसात विचारणा केली नाही. राजेशची पत्नी शोभा व मुलगी साक्षी यांना चौकशीसाठी बोलावले असता आम्ही काहीच केले नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे त्यांना आम्ही बाहेर सोडले.त्यांचा हालचालीवर सी.सी .टी व्ही च्या माध्यमातून लक्ष ठेवले. त्यावेळी त्यांच्या असणाऱ्या हालचाली,मेसेज ,फोन वरून एक नंबर ट्रेस केला .तो नंबर एकच होता.त्यावरून देवराज शेवाळे याला कराड येथून ताब्यात घेतल्यावर खुनाचा उलगडा झाला.गुन्ह्यातील मोटरसायकल, दोरी,उशी,सुरी जप्त केली आहे. शिराळा येथील नाथ यात्रेत आलेल्या सर्व व्यावसायिकांची कसून तपासणी केली.यासाठी २२ लोक अहोरात्र झटत होते.
मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर
0 Comments