शिराळा:आईने पाठ फिरवली वडिलांच्या प्रेमाचं छप्पर उडालं .त्यानंतर मिळणारी आजीची उब संघर्षाच्या ठिणगीत जाळून खाक झाली. खेळण्या- बागडण्याच्या व बाल हट्टाच्या वयात निराधार झालेल्या चार भावंडावर एकमेकांना धीर देत जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. नियतीने क्रूर थट्टा करून काळवंडलेल्या याचार चुमुकल्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणण्यासाठी दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांनी पुढाकर घेवून त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. ही दर्दभरी काहणी आहे शिराळा तालुक्यातील माळेवाडी येथील विकास दिंडे यांच्या कुटुंबातील चौदा वर्षीय सुवर्णा बारा वर्षी विद्या, आकरा वर्षीय प्रसाद आणि दहा वर्षीय अथर्व या चौघां भाऊ बहिणींची .देवा तूच सांग आम्ही काय चूक केली असा सवाल चिमुकले परमेश्वराला करत आहेत.
पहा चार निराधार भावंडांची काहणी
ज्यांना या मुलांना मदत करायाची असले त्यांनी माहितीसाठी
९५५२५७१४९३ या नंबरवर संपर्क साधावा
घरात आई-वडिलांची दररोज भांडणे होत असल्याने तीन वर्षा पूर्वी आईच घर सोडून निघून गेली. वडील आणि आजी मुलांचा चांगला संभाळ करत होते. दहा महिन्या पूर्वी ऑगस्ट महिन्यात वडिलांचे निधन झाले. त्यानंतर सांभाळ करणारी आजी पाच महिन्या पूर्वी देवघरी गेली.त्यामुळे मुलांचा संभाळ करण्यासारखी चुलत्यांकडे अथवा पै- पाहुण्यांच्यात कोणाचीही परिस्थिती नाही. मांगरूळ येथे राहत असणारी मुलांची आत्या सुजाता व मामा आकाराम हे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांनी आश्रम शाळा जावडे रत्नागिरी येथे अनाथाश्रमात या भावंडांना ठेवले. तिथे शिक्षणाचा आणि जेवणाचा खर्च मोफत असल्याने सध्या ही चौघे भावंडे आश्रमातच राहतात. आश्रम शाळेतील शिक्षक सुट्टीला गावाकडे आणून सोडतात .गावाकडे चुलते आणि चुलती आहे. परंतु दोन्हीही अपंग असल्याने त्यांना जगणे मुश्किल असताना या चार मुलांचा ते कसा सांभाळ करतील. मांगरूळ येथे राहणारे आत्ती आणि मामा हे वरचेवर भेटतात . कपडे देत असतात. परंतु तूटपुंज्या पगारात त्यांचच भागत नाही. मग या मुलांचं कुठून भागवणार.गेले एक वर्षापासून आपल्या नशिबी आलेले भोग सोसत भावंडे एकमेकांच्या चेहऱ्यावर हात फिरवतात दुःख गिळून टाकतात. त्यांना सध्या कोरड्या सहानभूती पेक्षा आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांना आश्रमात शालेय साहित्य ,शिक्षण व जेवण मोफत असले तरी इतर मुलांच्या प्रमाणे आपणाला हक्काने बाहेर काही तरी खाता यावे .हव्या असणाऱ्या गरजेच्या व आवश्यक वस्तू खरेदी कराव्यात असे वाटत असणार .त्यासाठी ते बाल हट्ट कोणाकडे करणार म्हणून त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
पंधरा तारखेपर्यंत शाळेची सुट्टी संपणार आहे. त्यानंतर ही मुलं आश्रम शाळा जावडे जि. रत्नागिरी येथे जाणार आहेत. तत्पूर्वी ज्या कोणाला या मुलांना आर्थिक सहाय्य करायचे असेल किंवा कपडे द्यायचे असतील तर त्यांना माळेवाडी येथील राहत्या घरी नेऊन द्यावी. या मुलांच्या जवळ कोणताही मोबाईल नाही. या संदर्भात संपर्क साधायचा असेल तर मामा आकाराम खांडेकर - 9702026875 या नंबरसी साधावा. AC no - 02705110016218
IFC:- Ibklosdc027
0 Comments