शिराळा,ता.९ : सेवा काळात चागले काम करून सेवा निवृत्त होणे महत्वाचे आहे. नेहमी कामात तत्पर राहून प्रामाणिक सेवा बाजवली तर आयुष सुखकर होते. दिनकर चौगुले यांनी ३५ वर्षात केलेल्या निष्कलंकित सेवेचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
शिराळा येथील लकी मंगल कार्यालयात शिराळा पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी दिनकर चौगुले यांच्या सेवा निवृत्ती व सत्कार आणि निरोप समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी रणधीर नाईक म्हणाले, आपल्या ३५ वर्षाच्या सेवा काळात चांगली सेवा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिनकर चौगुले असून त्यांनी केलेल्या कामाची प्रेरणा इतरांनी घ्यावीआपले काम प्रामाणिक व चोख करणारा अधिकारी म्हणून त्यांनी आपली सेवा बजावली. कामाचा माणूस म्हणून वेगळा ठसा उमटवला. शासकीय सेवेतून मुक्त झाले असले तरी त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय होऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी.
दिनकर चौगुले म्हणाले,आपले काम करताना प्रामाणिक पणे करून तणाव मुक्त जीवन जगावे.मला माझ्या सेवा काळात अनेक चांगले सहकारी मिळाले.त्यामुळे काम करण्यास प्रेरणा मिळाली.
स्वागत व प्रास्ताविक सुरेश सातवेकर यांनी केले.यावेळी प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंग नाईक, गट विकास अधिकरी संतोष राऊत, वकील संजय नाईक, विस्तार अधिकारी सुरेश सातवेकर, अशोक कुरणे, बाजार समितीचे उपसभापती विजय महाडिक, गोरख कुरणे, राजेंद्र पाटील, राजेंद्र चौगले, सचिन पाटील, सुरेश चौगुले, शाखा अभियंता शाळीग्राम साळुंखे,सर्व वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सेवक, सेविका,सहायक,सहायिका, तालुका समुख संघटक, गट प्रवर्तक उपस्थित होते. आभार सतीश साळुंखे यांनी मानले.
0 Comments