शिराळा :ता.२१: सागाव ता.शिराळा येथील किरवणतळे येथे वन विभाग शिराळा व ग्रामपंचायत सागाव यांच्या संयुक्त विद्यमाने वट पौर्णिमेनिमिताने वडाची २०० रोप लावून वड महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सरपंच अस्मिता पाटील म्हणाल्या ,वृक्षारोपणावेळी पूजा करताना महिलांनी त्यांचे दीर्घायुष्य चिंतले. पर्यावरण दृष्ट्या अत्यंत पूरक समजली जाणारी वडाची झाडे पुढच्या काळात सागाव व पंचक्रोशीला मायेच्या सावली बरोबरच मनुष्य धर्माकडून लोप पावत असलेल्या दातृत्वाचा संदेश देत राहतील. शेकडो वर्षे जगणारी ही झाडे निसर्ग सौंदर्याबरोबरच पर्यटनाला बळ देतील. येत्या काळात होत असलेल्या निसर्ग कायापालटाबद्दल आपण वनखात्याचे नेहमीच ऋणी राहू .
यावेळी सरपंच अस्मिता पाटील,उज्वला देशमुख, शोभा देशमुख , उमेशनाथ महाराज, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनपाल अनिल वाजे,विक्रम गवळी वनपाल डी. बी. बर्गे,वनरक्षक हणमंत पाटील, स्वाती कोकरे, रजनीकांत दरेकर, भिवा कोळेकर ,बाबासो गायकवाड ,मोहन सुतार ,उपस्थित होते.
0 Comments