BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मुलांच्यावर चांगल्या संस्काराची पेरणी करा Inculcate good manners in children

  


 वाकुर्डे बुद्रुक  ता.शिराळा येथे महादेव गल्लीमध्ये स्वराज्य शिक्षण संस्थेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता मेणकर यांचा सत्कार करण्यात आला.

शिराळा,ता.२६: आपल्या मुलावर  कोणते संस्कार करायचे ते आई-बाबांनी ठरवायचे असतात. तेच संस्कार  मुलाची ओळख बनते .त्यामुळे  मुलांच्यात  आई-बाबांनी चांगल्या संस्काराची पेरणी करावी असे प्रतिपादन  शिराळा पोलीस ठाण्याच्या  सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता मेणकर यांनी केले.

  वाकुर्डे बुद्रुक  ता.शिराळा येथे महादेव गल्लीमध्ये स्वराज्य शिक्षण संस्थेच्या वतीने, दोन तास अभ्यासासाठी  या उपक्रमांतर्गत  विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व गणवेशाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी मुंबई देवनार पोलीस ठाण्याच्या  सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता महिंद, उपजिल्हा रुग्णालय शिराळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज महिंद  यांची प्रमुख  उपस्थिती  होती.

 यावेळी  मेणकर म्हणाल्या, गाव पातळीवर एखादी व्यक्ती सामाजिक काम करत असताना, त्याला मागे ओढले जाते. पण स्वराज्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गणेश जाधव यांनी स्तुत्य उपक्रम राबवला आहे. यात  सातत्य ठेवले तर निश्चितच या गावातून मोठे अधिकारी घडून, तालुक्याचे आणि जिल्ह्याचा नावलौकिक  होईल. समाजात  चांगले उपक्रम राबत असतील, त्या संस्थेला सहकार्य करणे गरजेचे आहे..

 यावेळी  स्वराज्य शिक्षण संस्थेने घेतलेल्या अकरा दत्तक विद्यार्थ्यांना  सह इतर मुलांना शालेय वस्तुसह गणवेशाचे वाटप करण्यात आले. बारावी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या  ऋतुराज जंगम यांचा सत्कार करण्यात आला. 

 यावेळी माजी पोलीस अधिकारी  शामराव वाघ, सरपंच आनंदा कुंभार उपसरपंच अशोक पाटील, राजाराम जंगम, रघुनाथ सावंत, संतोष सुतार, वसंत शेटके, तानाजी पाटील स्वराज्य शिक्षण संस्थेचे कार्यकर्ते, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार गणेश जाधव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments