शिराळा ,ता.२५ :शिराळा येथे खून करून प्रवासी बॅगेतून टाकलेल्या मृताच्या कवठीवरून त्या व्यक्तीचे प्राथमिक स्वरुपात चित्र तयार करण्यात आले आहे. या वर्णनाची व्यक्ती बेपता झाली असल्यास शिराळा पोलीसाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सिधेध्वर जंगम यांनी केले आहे. या खुना संदर्भात माहिती देणाऱ्यास पोलिस प्रशासनाकडून रोख २५ हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, विभागीय पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या सहकार्याने दोन तपास पथके तयार करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी आपल्या सहकाऱ्या समवेत तपास यंत्रणा गतिमान केली असली तरी अद्याप ठोस असे कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. त्यामुळे कवठीच्या आधारे मृताचे चित्र तयार करण्यात आले आहे.
सोमवारी २० मे रोजी सकाळी साडे नऊ च्या दरम्यान येथील बाह्य वळण रस्त्यावरील कापरी फाटा ते सुरले वस्ती दरम्यान असणाऱ्या पुला जवळ एक प्रवासी बॅग असून तिथून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना भ्रमणध्वनी वरून कळवण्यात आली होती.. त्यावेळी तात्काळ शिराळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिता मेणकर , पोलीस हवलदार सुभाष पाटील,संदीप पाटील,सुनील पेटकर,नितीन यादव,अमोल साठे, सुनील पाटोळे,महेश गायकवाड,संदीप भानुसे, रजनी जाधव, अमर जाधव या आपल्या सहकाऱ्या समवेत घटनास्थळी धाव घेतली असता एका प्रवाशी बॅग मध्ये सतरंजी मध्ये गुंडालेलाला नायलॉन दोरीने गळा व शरीरास बांधून घातलेला सडलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आला..या सांगाड्यावर पिवळ्या रंगाचा टी शर्ट , कंबरेस पंचरंगी दोरा आढळुन आला.मात्र कमरेच्या खालील कोणतेही वस्त्र आढळून आले नाही. घटनास्थळी श्वान पथक,ठसे तज्ज्ञ ,फॉरेनसिक व्हॅन आणली होती.मात्र ठोस असा कोणता ही पुरावा त्यांच्या हाती लागला नव्हता.
0 Comments