बुद्ध पौर्णिमेला २३ मे ला 'निसर्गानुभव कार्यक्रमात ८१ निसर्गप्रेमींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाटण, कोयना, बामणोली, कांदाट, चांदोली, ढेबेवाडी, हेळवाक आणि आंबा या वन परिक्षेत्रांतील जंगलातील ८१ मचानावर बसून अरण्यवाचनाचा थरारक अनुभवला. ढगाळ वातावरण, दाट धुके व पाऊस असूनसुद्धा अपुऱ्या प्रकाषात पाणवठ्यावर पार पडलेल्या या गणनेत बिबट्यासह एकुण १६ सस्तन वन्य प्राणी प्रजातींचे तसेच ११ वन्य पक्षी, परीसृप प्रजातीच्या २०० प्राण्याचे गणनेत दर्शन घडले.
निसर्गानुभव कार्यक्रम २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी याबरोबरच नगर, पुणे, मुंबई येथूनही निसर्गप्रेमींनी हजेरी लावली होती. निसर्गप्रेमींकडून भरून घेण्यात आलेल्या अभिप्रायांनुसार गणनेसाठी सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींनी निसर्गानुभव कार्यक्रम व त्याकरिता दिलेल्या सोईसुविधांबाबत संतुष्टता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सर्व मचाणींवर वन्यप्राण्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दर्शन घडले आहे. मचाणावर निसर्गप्रेमींना गणनेची माहिती भरण्याकरीता प्रपत्र देण्यात आले होते. रात्रभर जागे राहून पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची नोंद निसर्गप्रेमीं कडून करण्यात आली. सदर नोंदीनुसार त्यांना ८१ मचाणींवर दोनशेहून अधिक वन्यप्राण्यांचे दर्शन घडले आहे. निसर्गानुभव कार्यक्रमासाठी उपस्थित प्रगणकांना व्याघ्र प्रकल्पातर्फे भेट म्हणून निसर्ग पुस्तके तसेच टी-शर्ट, टोपी , भेटस्वरूपात देण्यात आले. निसर्गानुभव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच् क्षेत्र संचालक एम. रामानुजम, उपसंचालक कोयना उत्तम सावंत ,उपसंचालक चांदोली स्नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पातील आठ वनक्षेत्रपाल यांनी परिश्रम घेतले.
दिनांक ०५ जानेवारी २०१० रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ हे ११६५.५७ चौ. किमी. आहे. व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यात येतो. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा एकमेव आहे. येथिल जंगल हे सह्याद्रीतील उर्वरीत घनदाट व चांगल्या श्रेणीतील शिल्लक राहिलेले जंगल आहे. पश्चिम महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या कोयना व वारणा जलाशयाचे गाळाने भरण्यापासून संरक्षण हे जंगल करीत आहे. १५ नद्यांचा उगम या जंगलातून होतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेले कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने घोषित केलेले "जागतिक नैसर्गिक वारसास्थळ आहे. तसेच Birdlife International या जागतिक संस्थेने 'Important Bird Area' म्हणून घोषित केले आहे. येथिल जैवविधतेसाठी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे.
अशी होते गणना
बुद्ध पौर्णिमेला होणाऱ्या प्राणी गणनेत संपूर्ण जंगलात फिरती करून प्राणी मोजले जात नाहीत. पाणवठ्यावर रात्री आलेल्या प्राण्यांची संख्या मोजली जाते. त्याची नोंद घेतली जाते. जंगलातील प्राण्यांची संख्या ही प्रत्यक्षात दिसलेले प्राणी, ट्रॅप कॅमेरा सर्व्ह मध्ये आलेले प्राणी, प्राण्यांची प्रजाती , जंगलाचे क्षेत्र, पाऊल खुणा, प्राण्यांची विष्ठा यांचा अभ्यास करून फॉर्म्युला चा वापर करून संख्या निश्चित केली जाते.
पाणवठ्यावर आढळून आलेले प्राणी
बिबट्या १,गवे ९१ ,सांबर १६,रानकुत्री ३.ससे १९, पिसोरी /गेळा १, भेकर १७ ,अस्वले ८ ,उदमांजर ५, माकड ५,साळिंदर २, मुंगुस ३, शेखरू ७ ,वाटवाघूळ २, चकोत्री ५, रानकोंबडा १२, घुबड २ ,सर्प गरुड २, मोर १०, पर्वती कस्तुर ६, पांढऱ्या गालाचा कटूरगा ५,लाल बुडाचा बुलबुल १५,केसरी डोक्याचा कस्तुर २,धामण १,घोरपड १.
0 Comments