शिराळा तालुक्यात यावर्षी गावठी आंब्याची कमतरता भासणार असली तरी फणसाचे उत्पन्न समाधानकारक असल्यामुळे फणस उत्पाद्कांच्यात ख़ुशी तर आंबा उत्पाद्कांच्यात निराशाचे वातावरण आहे.
शिराळा तालुका हा डोंगरी तालुका आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात वडिलोपार्जित अंगणात व शेताच्या बांधावर आंबा व फणसाची झाडे मुबलक प्रमाणात आहेत. यावर्षी ७० टक्के गावठी आंब्याला मोहरच आलेला नाही.ज्या ३० टक्के झाडांना मोहर आला तो ही निम्या पेक्षा जास्त गळून गेल्याने व वानरे ,माकडे यांच्या मुळे तुरळक प्रमाणात आंब्याच्या कैऱ्या शिल्लक राहिल्या आहेत. मात्र यावर्षी फणस पीक जोमात आहे. अनेक ठिकाणी झाडाला पेलणार नाही एवढे फणस लागले आहेत. शिराळा तालुक्यात हापूस,पायरी, केशर अशा विविध जातीच्या आंब्याच्या बागा करणारे शेतकरी हे हाताच्या बोटावर माजण्या एवढे आहेत. हे आंबे महाग असल्याने सर्वसामान्य लोकांना परवडणारे नसतात.त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य लोक हे गावठी आंब्यावर आपली तलफ भागवत असतात.त्या आंब्याची गोडी ही वेगळीच असते.
0 Comments