एप्रिल महिन्याची सुरुवात झाली कि शहरी व ग्रामीण भागातील लोकांना वेध लागतात ते डोंगरच्या रान मेव्याचे. एप्रिल ते जून पर्यंत या तीन महिन्यात सर्वांना उपलब्धते नुसार डोंगरचा रान मेवा चाखण्याच्या आनंद मिळतो. आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात डोंबलं घ्याSSS.........डोंबलंSSS ची आरोळी कानावर पडू लागली आहे.त्यामुळे डोंबलाच्या रूपाने पहिला रानमेवा चाखण्याची संधी चालून आली आहे. त्यासाठी धनगर समाजातील महिला व पुरुष डोकीवर पाटी घेवून विक्रीसाठी बाहेर पडल्याने गल्लीबोळात डोंबलं घ्याSSS.........डोंबलंSSS ची आरोळी कानावर पडताच लोक खरेदीसाठी त्यांना बोलावून लागले आहेत. मात्र सध्याच्या नवीन पिढीला डोंबलं म्हणजे नेमके काय हेच माहित नाही. मात्र त्याच्या आंबट गोड चवीने जिभेचे चोचले पुरवले जात असून वेगळं काहीतरी खायला मिळायचा आनंद खाण्याऱ्या चेहऱ्यावर दिसून येथे आहे.
शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील धनगरवाडे आहेत.त्या ठिकाणच्या धनगर समाजातील लोक जांभळे, करवंदे,आळू ,डोंबलं, तोरण असा विविध प्रकारचा रानमेवा उपलब्धतेनुसार गोळा करून त्याची शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी विक्री करतात. शहरी भागात विक्री करण्यासाठी एस.टी च्या माध्यमातून १५० ते २०० किलोमीटर प्रवास मोठमोठ्या शहरात करतात.कारण त्यांना त्या ठिकाणी रोख पैसे मिळतात. त्यांच्या विक्रीचे माध्यम हे तराजू अथवा वजन काटा नसून त्यांची मुठ अथवा तपकिरीचा लहान डब्बा अथवा ग्लास असते.मुठीच्या अंदाज त्या रान मेव्याची किमत ठरवली जाते. डोंबलं विक्रीस २० रुपया पासून सुरु होत आहे. वयोवृद्ध लोक दूर जाता येत नसल्याने नजीकच्या ग्रामीण भागात फिरून धान्यावर रान मेव्याची विक्री करतात. जेवढे धान्य तेवढा रानमेवा हे माप ठरलेले असते. त्यामुळे शहरातून पैसा आणि ग्रामीण भागातून धान्य मिळत असल्याने विक्रेत्यांना दुहेरी लाभ होत आहे.मात्र हा रानमेवा गोळा करण्यासाठी स्वतंत्र व विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा असते.त्यामुळे ज्यांचे कुटुंब मोठे त्यांना जास्त फायदा होत आहे. अजून जांभळ व करवंदे लहान असल्याने सध्या डोंबलं विक्री सुरु आहे.
डोंबलं हे भारतात आढळणारा एक प्रकारचा रानमेवे आहे. ते सह्याद्रीच्या डोंगराळ भागात, विशेषतः कोकण आणि पश्चिम घाटात आढळतो डोंबलं हे लहान, गोल आणि गडद तांबूस रंगाचे असतात. ते गोड आणि आंबट चवीचे असतात. ते एप्रिल ते जून दरम्यान आढळून येतात,डोंबलं खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते व्हिटॅमिन सी, ए आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. ते अँटिऑक्सिडंट्सचा देखील चांगला स्रोत आहेत. डोंबलं खाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास, पचन सुधारण्यास आणि त्वचेसाठी चांगले असल्याचे म्हटले जाते.डोंबलं ताजी खाल्ली जाऊ शकतात किंवा त्यापासून रस, वाइन, जेली आणि जाम बनवले जाऊ शकते.
0 Comments