शिराळा: येथे भारतीय जनता पार्टीच्या वर्धापनदिना निमित्ताने जेष्ठ नागरीकांचा सत्कार करताना भाजप नेते प्रतापराव पाटील सोबत संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलवडे,सदस्य विजय गराडे |
शिराळा,ता.६:भारतीय जनता पार्टीच्या वर्धापनदिना निमित्ताने शिराळा विधानसभा निवडणुक प्रमुख सम्राट महाडिक बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नागरीकांचा सत्कार भाजप नेते प्रतापराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी दत्ताजीराव यादव, काशीनाथ कांबळे,अनिल गरगटे ,यांच्या सह अनेक जेष्ठ नागरीकाचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे नियोजन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलवडे यांनी केले. यावेळी भाजपा महिला ग्रामीण उपाध्यक्षा सरोजिनीताई कदम ,भाजपा सरचिटणीस अनिताताई इंगवले ,भाजप कार्याध्यक्ष राम जाधव ,जयसिंग गायकवाड ,भाजपचे तालुका उपाध्यक्ष तात्या पाटील ,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सौरभ नलवडे ,भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य हारुण शेख ,संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य विजय गराडे ,ग्रामपंचायत सदस्य रोहित देसाई ,अमोल पाटील ,सरचिटणीस सुरज पाटील ,विकास रोकडे ,सचिन दिवटे ,विश्वजित धस ,शुभम पाटील ,झाकीर दिवाण ,कर्तव्य पाटील ,ऋषीकेश गोसावी ,निवास नलावडे ,वैभव इंगवले ,मुस्तफा मुल्ला ,विशाल देसाईउप स्थित होते
0 Comments