सध्या कडक उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा सकाळच्या सुरु झाल्या आहेत. दुपारी शाळा सुटल्या नंतर कडक उन्हामुळे अनेक मुलं मित्रांच्या समवेत अथवा आपल्या पालकांच्या समवेत नदी,तलाव,कालवा, विहिरी अशा ठिकाणी जातात. बहुतांशी मुल आपले पालक पोहायला पाठवणार नाहीत म्हणून घरी न सांगता जातात. तर काही तरुण पार्टी करण्यासाठी नदी व तलावच्या काठी जातात. त्या ठिकाणी एकमेकांच्या इर्शेवर पोहण्याच्या स्पर्धा लावता. लहान मुलांना पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने तर युवकांना नशेत असता स्पर्धेपोटी अनेकवेळा आपला जीव गमवावा लागला आहे.अशा घटना जास्ती जास्त उन्हाळ्यात घडत असतात.पोहणे हा चांगला व्यायाम असला तरी तो जीवावर बेतणार नाही याची तितकीच काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे पालकांनी आता सकाळच्या शाळा असताना व उन्हाळी सुट्टी लागल्यावर आपल्या मुलांच्यावर नजर ठेवून त्यांची सुरक्षितता अबाधित ठेवणे गरजेचे आहे.
मुलं पोहायला जात असतील तर पालकांनी हे करावे:
सुरक्षा:
लहान मुलांना कधीही एकटं पोहायला सोडू नका.
पाण्यात उतरताना आणि पोहताना त्यांच्यावर सतत नजर ठेवा.
मुलाला पोहायला चांगलं येत असेल तरीही त्यांना तुमच्यासोबत किंवा इतर जबाबदार व्यक्तीसोबत पोहायला पाठवा. मुलाला पोहण्याचे योग्य तंत्र शिकवा. युवकांनी मद्यधुंद अवस्थेत असताना पोहण्याचा मोह टाळावा .
मुलाला लाईफ जॅकेट किंवा इतर सुरक्षा उपकरणं घालून द्या.
पाण्याची खोली आणि प्रवाह यांच्यानुसार पोहायला पाठवा.
आरोग्य:पोहायला जाण्यापूर्वी आणि नंतर तुमच्या मुलाला भरपूर पाणी आणि योग्य जेवण द्या.
मुलाला एखादी वैद्यकीय समस्या असेल तर पोहायला जाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
इतर:मुलाच्या मौल्यवान वस्तू घरी ठेवा.
पोहायला जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घ्या. मुलाला पोहायला चांगलं येत नसेल तर त्यांना पोहण्याचे वर्ग घ्या.
ठिकाणानुसार काळजी:
नदीत पोहायला जात असाल तर प्रवाहाची दिशा आणि वेग याची माहिती द्या.
समुद्रात पोहायला जात असाल तर लाटांची उंची आणि वेग याची माहिती द्या.
तलावात पोहायला जात असाल तर पाण्याची खोली आणि स्वच्छता यांची माहिती करून घ्या.
0 Comments