हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाने शाहुवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने आता पर्यंत दुरंगी वाटणारी हातकणंगलेची निवडणूक तिरंगी होणार आहे.मात्र सत्यजित पाटील यांच्या उमेदवारीने शिराळा विधानसभा मतदार संघात मत विभागनीला वाव मिळाला आहे. हातकणंगलेच्या मैदानात आजी माजी खासदारांच्या लढतीत माजी आमदारांची कसोटी पणाला लागणार आहे.
माजी आमदार सत्यजित पाटील यांचा त्यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर हे गेले ३० वर्षे विश्वास कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत.त्यामुळे शिराळा तालुक्याशी त्यांचे जवळचे नाते आहे. लोकसभेसाठी पहिल्यांदा शेजारील तालुक्यातील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने लोकांच्यात साहजिकच आपुलकी राहणार आहे. विश्वास कारखान्याचे कार्यक्षेत्र हे शिराळा व शाहुवाडी तालुका आहे.सत्यजित पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठकारे गटाचे असले तरी विश्वास कारखान्याच्या माध्यमातून आमदार मानसिंगराव नाईक यांच्या जवळचे सहकारी आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाची ताकद ही सत्यजित पाटील यांच्या पाठीशी राहील. निवडणुका जाहीर झाल्याने या मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेसाठी चर्चेत असणारे उमेदवार थेट हे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची निगडित नसल्याने या मतदारसंघातील नाईक,देशमुख,महाडिक यांची भूमिका निर्णयक ठरणार असे चित्र होते.परंतु माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाल्याने महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याची उत्सुकता होती.मात्र ठाकरे गटाने सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने तुल्यबळ असणाऱ्या तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. माने यांच्या पाठीशी ,सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांचे तर सत्यजित पाटील यांच्या पाठीशी आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक आणि शेट्टी यांच्या पाठीशी पक्ष विरहित सर्व सामान्य शेतकरी राहणार असल्याने तिन्ही उमेदवारांना आपल्या माताधिक्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे ऊसदर आंदोलनामुळे शेतकऱ्यांची ओढ आहे. खासदार धैर्यशील माने यांनी विविध विकास कामांची मंजुरी आणून अनेक गावात आपला निधी खर्च केला आहे. ऊसदराच्या माध्यमातून शेट्टीनी घरोघरी जाऊन आपला प्रचार निवडणुकीपूर्वीच सुरू केला आहे. आपण गावोगावी दिलेल्या निधीच्या कामाच्या माध्यमातून धैर्यशील माने यांनी गावोगावी संपर्क यंत्रणा राबवली आहे. मात्र सत्यजित पाटील यांना ओळख असलीत तरी मतदार संघासाठी आगामी काळात काय भूमिका घेणार यासाठी महाविकास आघडीच्या माध्यमातून रान उठवावे लागेल.
0 Comments