शिराळा: येथे भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या निमित्ताने पक्षाचा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी सत्यजित देशमुख, संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील, रणजितसिंह नाईक. |
शिराळा,ता.६: भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय शिराळा येथे भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे प्रमुख, भाजपा नेते सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित होते. या दरम्यान पक्षाचा झेंडा फडकावत भाजपा पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी देशमुख यांनी संवाद साधला.
सत्यजित देशमुख म्हणाले, सेवा, समर्पण व त्याग या त्रिसूत्रीवर भारतीय जनता पार्टीतील प्रत्येक सदस्य कार्यरत असून आपल्या परिवारावर असाच पाठींबा व प्रेम सदैव ठेवा . आजच्या आपल्या परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मोठ्या संख्यने भाजपा सरकारला निवडून देण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करावे. यावेळी जेष्ठ नागरिकांचा सत्कार करून पेढे वाटप करण्यात आले. मतदार यादी चे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख,के. डी. पाटील, रणजितसिह नाईक, भाजपा तालुका उपाध्यक्ष अभिजित नाईक, आंनदराव पाटील,सत्यजित पाटील, भाजपा शहराध्यक्ष संतोष गायकवाड,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रदीप पाटील,रमेश पाटील,सैनिक सेल अध्यक्ष राजाराम पाटील, तानाजी कुंभार, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा वैभवीताई कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस संगीता सांळूखे, जिल्हा मजूर फेडरेशन सदस्य धनाजी नरुटे, सरचिटणीस संभाजी नलवडे, किरण गायकवाड,पंचायत राज जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष जगदीश कदम, सत्यविजय भोसले,योगेश कुलकर्णी,किसान मोर्चा उपाध्यक्ष सम्राट गायकवाड, उपस्थित होते.
0 Comments